मलायका, अर्जूनसारखं मालदिवला जायचंय, कमी बजेटमध्ये असे फिरा

maldives
maldives
Updated on

मालदीव सेलिब्रिटींमध्ये खूप लोकप्रिय आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटींचे मालदीवच्या सुट्टीतील फोटो आपल्याला पाहायला मिळतात. ते फोटो पाहून तुम्हालाही मालदीवला जायची इच्छा होत असेल. पण आपलं बजेट पाहता ही इच्छा पूर्ण होईल का, असं मनात येतं. कारण परदेशात सहलीला जायचं असेल तर अव्वाच्या सव्वा खर्च येतो. अशावेळी इथे कसं जायचं असा प्रश्न पडतो. तुम्ही कमी बजेट असले तरी मालदिव ट्रीप प्लॅन करू शकता.

Pooja Hegde In Maldives
Pooja Hegde In Maldives

बजेट प्लॅन करा

तुम्ही जर मालदिवला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, त्यासाठी काही महिने आधीच तयारी करा. बजेट सेट करा आणि त्यासाठी बचत करत रहा. तसेच किमान 4-5 ट्रॅव्हल एजंटांकडून पॅकेजची माहिती मिळवा आणि स्वतः ऑनलाइन शोध घेत राहा. याशिवाय मालदीवला जाण्यासाठी ऑफ सीझनचे महिने म्हणजे एप्रिल ते जून निवडा. म्हणजे तुम्हाला खर्च कमी येईल.

विमानाचे तिकिट असे करा बुक

तुम्हाला सगळ्यात आधी फ्लाइट बुक करायचे आहे, तुम्ही आगाऊ तिकीट बुक केल्यास तुमचा खर्च बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो. लक्षात ठेवा की तुम्ही लोकल ट्रिपची योजना आखत नाही, त्यामुळे शक्य असल्यास, तुमची तिकिटे किमान 3-4 महिने अगोदर बुक करा.

दिल्ली ते माले ट्रिपचा खर्च- 8,664 रुपयांपासून सुरू, वन-वे/ प्रति माणशी

मुंबई ते माले ट्रिपचा खर्च- 7,772 रुपये से शुरू, वन-वे/ प्रति माणशी

maldives
maldives

हॉटेलचा खर्च

मालदिवमध्ये खाजगी आणि स्थानिक अशी दोन्ही प्रकारची बेटं आहेत. तुम्हाला खासगी बेटावर लक्झरी सुविधा मिळतील. पण ते रिसॉर्ट्स खूप महाग आहेत. तुमची बजेट ट्रीप असल्याने खाजगी बेटांपेक्षा सार्वजनिक बेटांवर हॉटेल बुक करा. तेथे तुम्हाला छान गेस्ट हाऊस मिळतील.

वाहतूक

मालदीवमध्ये एका बेटावरू दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी पर्यटक सहसा स्पीड बोट भाड्याने घेतात. स्पीड बोट महाग असू शकतात. म्हणूनच तुम्ही मालदीवमध्ये फिरण्यासाठी स्थानिक गाड्यांची मदत घ्या. त्यांची किंमत 70 ते 250 रुपये असेल.

पाण्यात खेळा पण सांभाळून

मालदीव हे वॉटर एक्टीव्हिटिजसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही जेट स्कीइंग, फ्लायबोर्डिंग, बनाना बोटिंग, काईट सर्फिंग, डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंग करू शकता. मात्र, कोणतेही पॅकेज घेण्यापूर्वी बजेटचा विचार करा. स्थानिक जागी कदाचित तुम्हाला स्वस्त पर्याय मिळका. मालदीवमध्ये 9000 ते 70 हजार रुपयांपर्यंत असे खेळ उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार वॉटर अ‍ॅक्टिव्हिटी निवडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.