Travel Blog : चवदार पदार्थांवर ताव मारायला 'या' ठिकाणी गेलंच पाहिजे!

अनेक हॉलिवूड अभिनेते आणि अब्जाधीशांनी भारतीय जेवणाचे इथल्या चवीचे कौतूक केले आहे.
Travel Blog
Travel Blog
Updated on

भारतीय खाद्यपदार्थ इतके चवदार आणि चविष्ट आहेत कि जगभरात त्याचे चाहते आहेत. परदेशी पर्यटकही आवडीने भारतीय पदार्थांवर ताव मारतात. अनेक हॉलिवूड अभिनेते आणि अब्जाधीशांनी भारतीय जेवणाचे इथल्या चवीचे कौतूक केले आहे. गायक जस्टिन बीबरला चिकन टिक्की आवडते, तर ज्युलिया रॉबर्ट्स मटर पनीरसाठी वेडी आहे.

हे झाले परदेशी लोकांचे खाण्यासाठी वेड पण, भारतातही खाण्यासाठी लोक वेडे आहेत. भारतात प्रत्येक राज्यानुसार संस्कृती बदलते. आणि संस्कृतीनुसार पारंपारिक खाद्यपदार्थ बदलतात. आज पाहुयात भारतात कुठे काय चांगले मिळते. जेणेकरून तुम्हालाही त्या पदार्थांवर मनसोक्त ताव मारता येईल.

Travel Blog
Astro Tips : महत्वाच्या 'या' ५ गोष्टी नियमित केल्यास तुमचं नशीब फळफळेल

पटणाचा फेमस लिट्टी चोखा

बिहारचे नाव घेतले की सर्वात पहिले खाण्यामध्ये लिट्टी चोखा चे नाव तोंडात येते. लिट्टी चोखा हि बिहारची ओळख असलेली डिश आहे. बिहारच्या मातीचा वास या पदार्थाला खास बनवतो. मॅश केलेले बटाटे-वांगी यांचे सारण आणि वरून पिठाची जाड लेअर हे तुपात तळून घेतले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये लिट्टी चोखा खाण्याची मजा काही औरच असते.

मुंबईचा वडा पाव

वडा पाव हे मुंबईचे प्रमुख स्ट्रीट फूड आहे. वडापाव तिखट आणि चमचमित असतो. कमी पैशात पोट भरण्यासाठी वडापावचा विचार केला जातो.

लखनऊचे टुंडे कबाब

लखनऊमध्ये टुंडे कबाब प्रसिद्ध आहेत. खिमा आणि खास मसाल्यापासून बनवले हे विशेष प्रकारचे कबाब बनवले जातात. जिभेवर ठेवल्यावर लगेच विरघळणारे टुंडे कबाब पराठे आणि हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह केले जातात.

Travel Blog
तणावामुळे गर्भपात होतो का? या दिवसांतील तणाव दूर करण्यासाठी काय करावे पहा?

हैदराबादची चिकन दम बिर्याणी

हैदराबाद म्हटले की, बिर्याणी डोळ्यासमोर येते. निजाम साम्राज्या हा शाही पदार्थ होता. या बिर्याणीचे 50 ते 60 प्रकार फक्त हैदराबादमध्येच मिळतात!

दिल्लीचे छोले भटुरे

तुम्हाला दिल्लीच्या चवीसारखे छोले भटुरे इतर कोठेही मिळणार नाहीत. छोले भटुरेचा स्वतःचा चाहता वर्ग आहे. भोगल छोले-भटुरे वाला, सीता राम दिवान चांद आणि चाचा दी हट्टी ही दिल्लीतील छोले भटुरेची काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत.

चेन्नईचा इडली डोसा सांबार

चेन्नईच्या महत्त्वाच्या पदार्थांमध्ये इडली, डोसा आणि सांबार यांची गणना होते. जागतिक स्तरावर हे पदार्थ चेन्नईचे प्रतिनिधित्व करतात. या स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेण्यासाठी सरवन भवन आणि दक्षिण ही प्रमुख ठिकाणे आहेत

Travel Blog
Recipe : पार्टीसाठी घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी; तळलेले मसाला बटाटा

मसाला फिश फ्राय

एकदा खाल्ल्यावर चव विसरू शकत नाही अशा पदार्थांमध्ये मसाला फिश फ्रायचा समावेश होतो. हा पदार्थ खाण्यासाठी जगभरातून लोक केरळमधील कोचीला येतात. कोचीमध्ये कायस रहमतुल्ला कॅफे आणि पेरियार रेस्टॉरंट मसाला फिश फ्रायसाठी प्रसिद्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.