कोरोनाची (coronavirus) परिस्थिती हळूहळू सामान्य होताच लोक फिरायला बाहेर पडतील. त्यावेळी भारतातील मनोरंजक आणि सुंदर स्थळ फिरण्यासाठी ते प्लान करतील, तर काहींच्या लिस्टमध्ये आधीच विदेशी ठिकाणं असतील. पण तुम्हाला माहित आहे का? परदेशासारखी (foreign countries) दिसणारी अनेक ठिकाणे भारतात आहेत. जर तुम्ही ही अद्भुत ठिकाणे नसेल पाहिलीत, तर हे अवश्य वाचा..
गुलमर्ग - अगदी स्वित्झर्लंड!
गुलमर्ग हे सुंदर शहर श्रीनगरपासून 52 किमी दूर आहे. आशियातील सर्वात उंच आणि सर्वात लांब केबल कार प्रकल्प गुलमर्ग गोंडोला येथे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. गुलमर्गचे सौंदर्य आणि त्याची बर्फाच्छादित शिखरे अगदी स्वित्झर्लंडसारखी दिसतात. जर तुम्हाला भारतात राहून विदेशी ठिकाणाचा आनंद घ्यायचा असेल तर गुलमर्गपेक्षा तुमच्यासाठी काहीही चांगले असू शकत नाही. जर तुम्हाला इथे कुरणांचा आनंद घ्यायचा असेल तर एप्रिल, मे आणि जून हे चांगले काळ आहेत आणि जर तुम्हाला बर्फाचा आनंद घ्यायचा असेल तर डिसेंबर ते मार्च ही चांगली वेळ आहे.
अलापुझा - वेनिस
दक्षिणेतील केरळमधील अलापुझा हे ठिकाण बॅक वॉटरचा आनंद घेण्यासाठी सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला व्हेनिस पाहायचे असेल तर हे तुमचे परफेक्ट डेस्टीनेशन असू शकते. इथे बांधलेली सुंदर जुनी चर्च नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात. शहरात दरवर्षी ऑगस्ट दरम्यान बोट शर्यतीचे आयोजन केले जाते, जे मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिकांना आकर्षित करते. येथे भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या हिवाळ्याच्या महिन्यात...
पुद्दुचेरी
फ्रान्सची राजधानी पॅरिस हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. पण तिथे जाण्यासाठी जर तुमचे बजेट इतके नसेल तर भारतात राहूनही फ्रान्सचा आनंद घेऊ शकता. भारताच्या पुदुचेरीमध्ये तुम्हाला फ्रान्सची झलक नक्कीच मिळेल. या ठिकाणाची विशेष गोष्ट म्हणजे ही जागा जवळपास 300 वर्षांपासून फ्रेंच अधिकारात आहे, ज्यामुळे आजही फ्रेंच वास्तुकला आणि संस्कृतीची झलक दिसते.
वैली ऑफ फ्लावर -एंटीलोप व्हॅली
एंटीलोप व्हॅली उत्तर लॉस एंजेलिस, कॅलिफोर्नियाच्या दक्षिण -पूर्व भागात स्थित आहे. पण भारतातही तुम्ही अनुभवू शकता. होय, उत्तराखंडच्या हिमालयीन प्रदेशात अशी ठिकाणं आढळतात. यामध्ये एक सुंदर बाग आहे, फुलांची जगप्रसिद्ध व्हॅली जी 87.50 किमी परिसरात पसरलेली आहे. फुलांची ही जगप्रसिद्ध व्हॅली 1982 मध्ये युनेस्कोने राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केली.
लक्षद्वीप- मालदीव
मालदीव सेलिब्रिटींमध्ये खूप लोकप्रिय आहे. विशेष गोष्ट म्हणजे क्रिस्टल क्लिअर वॉटर, सुंदर समुद्रकिनारे आणि तेथील आलिशान रिसॉर्ट्स. तुम्हाला भारतातही असाच अनुभव आला तर? भारताचे लक्षद्वीप हे मालदीवसारखेच आहे. निळसर पाणी, समृद्ध समुद्री जीवन, सुंदर लँडस्केप, नैसर्गिक सौंदर्य आणि मोहक परिसर मालदीवला रोमांचकारी बनवते., लक्षद्वीप प्रशासनाने येथे प्रवेश करण्यासाठी परवाना आवश्यक केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.