सुहाना सफर! वैविध्यतेनं नटलेल्या भारताचे अतुलनीय सौंदर्य, या 3 लोकप्रिय पर्यटनस्थळांना नक्की द्या भेट

long Weekends In 2023 India कोणाच्याही मनावर जादू करतील अशीच प्रेक्षणीय व निसर्गानं समृद्ध स्थळे भारता देशाला लाभली आहेत. चला तर मग जाणून घेऊया पर्यटन स्थळांची संपूर्ण माहिती…
Long Weekend Story News
Long Weekend Story NewsSakal
Updated on

“सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान!”  बॉलिवूडमधील सुपरहिट सिनेमा ‘परदेस’ सिनेमातील या गाण्यामध्ये आपल्या भारत देशाचे खरंच अगदी तंतोतंत वर्णन करण्यात आले आहे. अहो फक्त या गाण्यातील भावच नव्हे, तर लंडन, पॅरिस, जपान यासारख्या देशांची वारी करणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या ( Best places to visit in India) मनातही भारत देशाबद्दल याच भावना आहेत.

विविधतेतील एकतेचे दर्शन घडवणारा देश म्हणजे भारत, ही आपल्या देशाची शक्तीशाली व सामर्थ्यपूर्ण अशी ओळख सर्वदूर परसलेली आहे.  आपल्या या भूमीवर विभिन्न संस्कृती, धर्माचे, शेकडो बोलीभाषा बोलणारे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत. तर पूर्वजांपासून मिळालेला अभिजात असा सांस्कृतिक वारसा भारतवासीयांनीही जपला आहे. 

बोलीभाषा, परंपरा, योग-आयुर्वेद, सांस्कृतिक कला, सामाजिक कार्य, पारंपरिक सणसमारंभ, नैसर्गिक वैभव अशा विविध अद्भूत- अद्वितीय गोष्टींनी नटलेल्या-सजलेल्या या देशाला जवळून पाहण्यासाठी,  येथील ऐतिहासिक वास्तू- कलाकृती-संस्कृती, हिमालयातील पर्वतरांगा, स्वादिष्ट पाककृती,  आदरातिथ्य याची देह याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो-कोट्यवधी परदेशी पर्यटक भारतातील वेगवेगळ्या प्रेक्षणीयस्थळांना आवर्जून भेट देतात.

Long Weekend Story News
Long Weekend 2023 India : ऑगस्टमध्ये येताहेत 2 लाँग वीकेंड, या सुंदर ठिकाणी करा ट्रिप प्लान

हे वर्णन ऐकू तुमच्या डोळ्यासमोरही भारताचे नयनरम्य असे चित्र उभे राहिले, हो ना! आणि भारतातील वेगवेगळ्या आकर्षक व मनमोहनीय ठिकाणांना (Top 3 places to visit in India) भेट देण्याची योजना आखण्यासाठी तुमची बोटे गुगल इंजिन सर्चकडे वळली ना. पण सुरुवात नेमकी कोणत्या भागातून करावी, हे कळत नाही आहे का?

Long Weekend Story News
Budget Trips: ‘या’ देशांमध्ये आहे Indian Rupee Value जास्त, तेव्हा स्वस्तात फिरा आणि मनसोक्त शॉपिंग करा

तुमचा हा गोंधळ उडणे साहजिकच आहे, कारण भारत हा एक सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण व भौगोलिकरित्याही विशाल असा देश आहे. येथील पर्यटन स्थळांची यादी भलीमोठी आहे. मित्रांनो मुळीच चिंता करू नका. भारतातील सर्वोत्तम व प्रसिद्ध प्रेक्षणीय ठिकाणे कोणती? याबाबतची माहिती शोधण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.

Long Weekend Story News
Family Trip: फॅमिली ट्रिपचा विचार करताय ? असे करा प्लॅनिंग आणि वाचवा अतिरिक्त खर्च...

या लेखाद्वारे आपण भारतातील तीन लोकप्रिय पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेणार आहोत, आता तरी पडला का तुमचा जीव भांड्यात? चला तर मग आपला प्रवास सुरू करूया. 

Srinagar
Srinagarsakal

 श्रीनगर ( काश्मीर) (Srinagar, Kashmir)

पृथ्वीवर साक्षात स्वर्ग पाहण्याची इच्छा असेल तर जम्मू-काश्मीरला नक्की भेट द्या. भूतलावरील स्वर्ग म्हणून काश्मीर हे पर्यटनस्थळ जगभरात प्रसिद्ध आहे. काश्मीरमधील श्रीनगर हे (What is the famous thing of Srinagar?) ठिकाण पर्यटनाचे प्रमुख केंद्रबिंदू आहे. प्रत्येक भारतवासीयाचे तसेच परदेशी पाहुण्यांचे हे आवडते ठिकाण.

निसर्ग, आदारातिथ्य आणि काश्मिरी सांस्कृतिक विविधतेचे केंद्र अशी श्रीनगरची ख्याती आहे. हे ठिकाण प्रत्यक्षात पाहिल्यानंतर तुम्हाला ते कॅन्हवासवरील एखाद्या नयनरम्य चित्राप्रमाणेच भासेल, यात शंकाच नाही.  स्थानिकांनी, पर्यटकांनी गजबजलेली काश्मीरची ही राजधानी कौटुंबिक सहलीकरीता (Best places to visit in India with family) भारतातील सर्वोत्तम ठिकाण आहे.

येथील दल सरोवरातील शिकारा राइड म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक संस्मरणीय अनुभव असेल. 

  • प्रमुख प्रेक्षणीय पर्यटन स्थळे : दल सरोवर, शालीमार बाग, ट्युलिप गार्डन, निशात बाग, शंकराचार्य मंदिर

  • कधी भेट द्यावी : एप्रिल महिना ते ऑक्टोबर महिना सर्वोत्तम काळ 

  • प्रवास कसा करावा : 

- रेल्वे मार्ग : श्रीनगरला भेट देण्यासाठी तुम्हाला ट्रेनने जम्मू तवी किंवा उधमपूर रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवास करावा लागेल. त्यानंतर या रेल्वे स्थानकांहून टॅक्सी, खासगी सरकारी बसने श्रीनगर गाठावे. 

- हवाई मार्ग : जर तुम्हाला त्रासविरहित व झटपट प्रवास करायचा असेल तर विमान प्रवासाचा पर्याय निवडू शकता. दिल्ली, मुंबई आणि चंदिगड या शहरातून श्रीनगर विमानतळ किंवा शेख उल-आलम आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाणे होत असतात. विमानतळाहून सरकारी प्रवासी सेवा अथवा एखाद्या खासगी पर्यटन वाहनाने तुम्ही श्रीनगर गाठू शकता. 

  • टीप : स्थानिक घडामोडी वारंवार जाणून घेणे आवश्यक आहे. 

Goa
GoaSakal

गोवा (Goa) 

रोजच्या धकाधकाच्या आयुष्याला कंटाळलेले आहात का? मग अशांत मनाला शांत करायचे असेल तर समुद्रकिनाऱ्याची नैसर्गिक देगणी लाभलेल्या गोवा या राज्याला नक्कीच भेट द्या.  गोवा (best places to visit in india in summer vacation) हे समुद्र किनारपट्टीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.

गोव्यामध्ये अनेक समुद्रकिनारे वेगवेगळ्या कारणांसाठी जगप्रसिद्ध आहेत. परदेशी पर्यटकांसाठी गोवा म्हणजे तर हक्काचे पर्यटनस्थळ. साहसी खेळ, किल्ले, चर्च, सुंदर समुद्रकिनारे, समुद्रकिनाऱ्यालगत राहण्यासाठी पारंपरिक तसेच मॉर्डन पद्धतीचे घरे, चविष्ट शाकाहारी-मांसाहारी खाद्यपदार्थ, रंगीबेरंगी पोषाखांची फॅशन इत्यादी वेगवेगळ्या कारणांसाठी गोवा हे ठिकाण पर्यटकांना नेहमी भुरळ घालते.

म्हणून मित्रवर्ग असोत किंवा कुटुंबीय त्यांच्या प्रवासाच्या यादीत गोवा हे ठिकाण हमखास पाहायला मिळते. 

  • प्रमुख प्रेक्षणीय पर्यटन स्थळे : दूधसागर धबधबा ( Dudhsagar Falls) , अगुआडा किल्ला, पालोलेम बीच, कोल्वा बीच, बागा बीच, अंजुना मार्केट, भारतीय नौदल एव्हिएशन संग्रहालय

  • कधी भेट द्यावी : गोवा भ्रमंतीसाठी नोव्हेंबर महिना ते फेब्रुवारी महिन्यापर्यंतचा काळ सर्वात उत्तम 

  • प्रवास कसा करावा : गोव्यात राज्यात पोहोचण्यासाठी प्रवास करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे विमानप्रवास. हवाईप्रवास परवडणारा नसेल तर आपण रेल्वे मार्गाने अथवा खासगी बसनेही प्रवास करू शकता.  

- जवळील  विमानतळ: दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ

- जवळील रेल्वे स्टेशन: वास्को-द-गामा रेल्वे स्टेशन (उत्तर गोवा), मडगाव जंक्शन (दक्षिण गोवा)

  • टीप : गोवा भ्रमंती सुखदायक व्हावी यासाठी तुम्हाला तेथे टु-व्हीलर वाहन भाडेतत्त्वावर घेता येते.

Varanasi, Uttar Pradesh
Varanasi, Uttar Pradeshsakal

वाराणसी, उत्तर प्रदेश (Varanasi, Uttar Pradesh)

एखाद्या धार्मिक पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी आपण नियोजन आखत असाल तर उत्तर प्रदेशातील वाराणसी हे शहर सर्वोत्तम ठिकाण. परदेशी पर्यटकांकडून तर या धार्मिकस्थळाला आवर्जून भेट दिली जाते. भारतातील हे एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे, जेथे भक्तगण मोठ्या श्रद्धेने-भक्तिभावाने हजेरी लावतात.

असंख्य पौराणिक मंदिरे, घाट परिसर, रंगीबेरंगी साहित्यांनी सजलेल्या बाजारपेठा, स्वादिष्ट खाद्यपदार्थ अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे हे धार्मिकस्थळ देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करते.

सायंकाळच्या वेळेस येथे होणारी गंगा आरती, घंटानाद, धुपारती, मनाला-कानाला शांती देणारे मंत्रोच्चार असे हे मनमोहक- सुखदायी-सकारात्मक धार्मिक वातावरण अनुभवण्यासाठी वाराणसीला नक्की भेट द्या मित्रांनो. दिवाळी सणादरम्यान येथील उत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारा असा अप्रतिम असतो. 

  • प्रमुख प्रेक्षणीय पर्यटन स्थळे : श्री काशी विश्वनाथ मंदिर, दशाश्वमेध घाट, रामनगर किल्ला, अस्सी घाट

  • कधी भेट द्यावी : ऑक्टोबर महिना ते मार्च महिन्यादरम्यान भ्रमंतीसाठी उत्तम काळ

  • कसा करावा प्रवास : वाराणसी शहरात भेट देण्यासाठी हवाई प्रवास तसंच रेल्वे मार्गाने आपण प्रवास करू शकता. 

- जवळील विमानतळ :  लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ

- जवळील रेल्वे स्टेशन : वाराणसी जंक्शन

  • टीप :  या शहरात नाइटलाइफ ही संकल्पना तितकीशी रूळलेली नाही. त्यामुळे येथे रात्री उशिरापर्यंत फिरणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.