India’s Famous Temple Prasadam : तिरूमलाचाच नाही तर प्रसिद्ध आहे भारतातील या मंदिरातील प्रसाद, प्रत्येकाने एकदा तरी खायलाच हवा!

Indian Temple Story : भारतात अशी इतर अनेक मंदिरे आहेत, जिथे प्रसाद लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि प्रत्येकाला तो खाण्याची विशेष इच्छा आहे.
India’s Famous Temple Prasadam
India’s Famous Temple Prasadam esakal
Updated on

India’s Famous Temple Prasadam :

भारतात सर्व धर्मांची अनेक प्रसिद्ध अध्यात्मिक ठिकाणे आहेत, त्यांना भेट देण्यासाठी दूरदूरहून लोक भारतात येतात. आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर यापैकी एक आहे, जे जगभरात प्रसिद्ध आहे. अलीकडे हे मंदिर त्याच्या प्रसादावरून वादात सापडले आहे.

सध्या संपूर्ण देशात एक मंदिर चर्चेत आले आहे. तिरूमला तिरूपती बालाजी येथे मिळणाऱ्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, बालाजी मंदिर जगभरात चर्चेत आले आहे. तिरूपती बालाजी येथे मिळाणारा लाडूचा प्रसाद खास आहे.

India’s Famous Temple Prasadam
Prasad Oak: मराठी इंडस्ट्रीमधील सगळ्यात जास्त मानधन स्वीकारणारा अभिनेता ? प्रसाद ओक म्हणाला...

तिरूमला येथील लाडू काही विशेष गोष्टींपासून बनवला जातो. दररोज ६ लाखांहून अधिक प्रसाद इथे बनवला जातो. यासाठी मोठ्या मशिन्सही तिथे उपलब्ध आहेत. केवळ तिथलाच नाही तर भारतातील काही मंदिरांमध्ये बनवला जाणारा प्रसादही प्रसिद्ध आहे. भाविक मोठ्या श्रद्धेने तिथे प्रसादाचे सेवन करतात.

या मंदिराचा प्रसाद भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. भारतात अशी इतर अनेक मंदिरे आहेत, जिथे प्रसाद लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि प्रत्येकाला तो खाण्याची विशेष इच्छा आहे. आज आपण भारतातील अशाच काही प्रसिद्ध मंदिरांबद्दल आणि त्यांच्या खास प्रसादाबद्दल सांगणार आहोत.

India’s Famous Temple Prasadam
Kerala High Court : पाकिस्तानात काम केल्याने कोणी शत्रू होत नाही! केरळ उच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल

माता वैष्णोदेवी मंदिर - जम्मू

जम्मूच्या सुंदर खोऱ्यांमध्ये असलेले माँ वैष्णोदेवीचे मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. भारतातील प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. माता वैष्णोदेवीचे मंदिर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. त्यामुळेच, इथे प्रत्येक हिंदू व्यक्ती देवीच्या दर्शनाची आस लावून जातो.

या मंदिराचा प्रसादही भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. येथे मिळणाऱ्या प्रसादामध्ये चिरमुरे, बत्ताशे, सफरचंद आणि नारळ इत्यादींचा समावेश आहे.

माता वैष्णोदेवी मंदिर - जम्मू
माता वैष्णोदेवी मंदिर - जम्मू esakal

सुवर्ण मंदिर, अमृतसर

पंजाब येथे असलेले सुवर्ण मंदिर केवळ देशातच नाही तर परदेशातही खूप प्रसिद्ध आहे. येथे मिळणाऱ्या लंगर प्रसादाला वेगळे महत्त्व आहे. देशी तूप, गव्हाचे पीठ, साखर, बदाम, पिस्ता आणि काजू सारख्या पदार्थांपासून बनवलेला एक अमृतसरी पिन्नी हा पारंपारिक गोड पदार्थ आहे. तसेच, तिथे रव्यापासून बनवलेला प्रसाद असतो ज्याला ‘कडा प्रसाद’ म्हणतात.

सुवर्ण मंदिर, अमृतसर
सुवर्ण मंदिर, अमृतसर esakal

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई

गणपती बाप्पाला आवडणारे मोदक सर्वांनाच आवडतात. महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे असलेले हे गणेशाचे मंदिर हिंदूंच्या प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात. येथे बाप्पाला आवडणारे मोदक प्रसाद म्हणून दिले जातात. लोक ते प्रसाद म्हणून देतात आणि ते स्वतः सेवन करतात.

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई
सिद्धिविनायक मंदिर, मुंबई esakal
India’s Famous Temple Prasadam
Tirumala Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये आढळले जनावराची चरबी अन् माशांचं तेल; 'या' पद्धतीने ओळखा तूपाची शुद्धता

गुरूवायूर मंदिर,केरळ

केरळमध्ये स्थित गुरुवायूर मंदिर त्याच्या खास प्रसाद पलापयासमसाठी देखील ओळखले जाते. तांदूळ, दूध आणि साखरेपासून बनवलेली ही गोड तांदळाची खीर आहे, जी देवाला अर्पण केल्यानंतर भक्तांमध्ये वाटली जाते. पचायला हलकी असलेली ही खीर आजारी व्यक्तीसाठीही महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे, श्रद्धाळू लोक इथे हजेरी लावून पायसमचे सेवन करतात.

गुरूवायूर मंदिर,केरळ
गुरूवायूर मंदिर,केरळ esakal
India’s Famous Temple Prasadam
हनुमानाच्या जन्म स्थळाचा वाद मिटला; 'या' ठिकाणाबाबत देण्यात आले पुरावे

श्री साईबाबा मंदिर, शिर्डी

महाराष्ट्रातील शिर्डी येथे असलेले हे साईबाबांचे मंदिर देश-विदेशात खूप प्रसिद्ध आहे. या मंदिरात साईनाथ महाराजांच्या दर्शनासाठी लांबून लोक येतात. येथे उदी प्रसाद म्हणून वाटली जाते, जी एक प्रकारची पवित्र राख आहे. तसेच डाळ, चपाती , भात, भाजी, मिठाई यासह भक्तांसाठी मोफत अन्नछत्र चालवले जाते.

श्री साईबाबा मंदिर, शिर्डी
श्री साईबाबा मंदिर, शिर्डी esakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()