IRCTC Gujrat Package : केवळ सतरा हजारात फिरा गुजरात; 9 दिवसाचे पॅकेज ऐकाल तर त्वरीत बुकिंग कराल

गुजरात हे व्यावसायिकांचे शहर म्हणून प्रसिद्ध
IRCTC Gujrat Package
IRCTC Gujrat Packageesakal
Updated on

IRCTC Gujrat Package : गुजरात हे व्यावसायिकांचे शहर म्हणून प्रसिद्ध असले तरी तिथे नव्याने टूरिस्ट पॉईंट विकसित केले जात आहेत. त्यामूळे तिथे पर्यटकांची ओघ वाढतच आहे.तूम्हालाही गुजरात टूर करायची असेल तर आईआरसीटीसीने नव्या कोऱ्या स्वस्त आणि मस्त पॅकेजची घोषणा केली आहे.

IRCTC Gujrat Package
IRCTC Honeymoon Package : हनिमूनसाठी अंदमानची टूर बजेटमध्ये; IRCTC ने आणले नवे पॅकेज

आईआरसीटीसी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी वेगवगेळ्या बजेटमध्ये विविध प्रकारचे पॅकेज घेऊन येत असते. त्यामूळे अनेक दिवस पेंडींग राहीलेले ट्रिपचे प्लॅन्स आता पूर्ण केले जात आहेत. जर तुम्हाला गुजरातला भेट देण्याचा विचार करत असाल तर तूमच्यासाठीच हे पॅकेज आहे.

IRCTC Gujrat Package
IRCTC Tour Package: 5,380 रुपयात फिरा राजस्‍थान ; 3 दिवसाचा खर्च उचलणार IRCTC

तुम्हाला स्वस्तात गुजरातला जायचे असेल तर IRCTC तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज घेऊन आले आहे. या टूर पॅकेजद्वारे तुम्ही फक्त 17 हजार रुपयांमध्ये गुजरातला भेट देऊ शकता. हे टूर पॅकेज ९ दिवसांचे असून यामध्ये प्रवाशांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था फ्रिमध्ये केली जाणार आहे.

IRCTC Gujrat Package
Diwali Package Food :१०० रुपयात ४ वस्तूंचं दिवाळी पॅकेज ही निव्वळ घोषणा? नेमकी परिस्थिती काय?

IRCTC प्रवाशांसाठी विविध कमी खर्चिक टूर पॅकेजेस ऑफर करत आहे. यामध्ये पर्यटक वेगवेगळ्या शहरांना भेटी देऊ शकतात. त्यामूळे पर्यटनलाही चालना मिळते. आता IRCTC ने गुजरातसाठी नवीन टूर पॅकेज आणले आहे. हे प्रवाशांना गुजरातमधील प्रमुख पर्यटन स्थळे अतिशय स्वस्तात पाहता येणार आहेत.

IRCTC Gujrat Package
चांगले salary package हवे असल्यास या गोष्टी लक्षात ठेवा

IRCTC चे गुजरात पॅकेज 21 जानेवारी 2023 पासून सुरू होईल. या टूर प्रवासाची सुरूवात बिलासपूर स्टेशनपासून सुरू होईल. ग्रँड टूर ऑफ गुजरात एक्स बिलासपूर असे या टूर पॅकेजचे नाव आहे. हे टूर पॅकेज 9 दिवस आणि 8 रात्रीचे आहे.

IRCTC Gujrat Package
Package Tour : एसटीचे आता त्र्यंबकेश्वर, वणी पॅकेज टूर; वेरुळ-अजिंठापाठोपाठ नवीन सेवा

ज्यामध्ये प्रवासी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी, भुज, कच्छचे रण, द्वारका, सोमनाथ आणि अहमदाबाद यासारख्या ठिकाणांना भेट देण्यात येणार आहे. प्रवासी ट्रेनच्या थर्ड एसी आणि स्लीपर कोचमधून प्रवास करता येणार आहे. प्रतिव्यक्ती १७,०३५ रुपये खर्च येणार आहे.

IRCTC Gujrat Package
Gujrat : ...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पूल कोसळतानाचा धक्कादायक Video Viral

गुजरातच्या या स्वस्त टूर पॅकेजमध्ये प्रवासी त्यांच्या बजेटनुसार स्लीपर क्लास आणि कम्फर्ट क्लासमध्ये प्रवास करू शकतात. प्रवाशांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळणार आहे.

IRCTC Gujrat Package
PM Modi in Gujrat : ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात दोन हात; पंतप्रधान मोदी

प्रवासी या पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com द्वारे बुकींग करू शकतात. तसेच इथे सविस्तर माहितीही घेता येईल. याचे बोर्डिंग, डि-बोर्डिंग पॉइंट विलासपुर-रायपुर-दुर्ग- भंडारा रोड आणि नागपुर हे आहेत. तूम्हालाही एवढ्या कमी खर्चात गुजरात अनूभवायचे असेल तर आजच हि टूर बुक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.