IRCTC Honeymoon Package : हनिमूनसाठी अंदमानची टूर बजेटमध्ये; IRCTC ने आणले नवे पॅकेज

प्रवाशांना फिरण्यासाठी वाव मिळावा यासाठी IRCTC सर्वोत्तम टूर्स ऑफर देत आहे
IRCTC Honeymoon Package
IRCTC Honeymoon Package esakal
Updated on

IRCTC Honeymoon Package : प्रवाशांना फिरण्यासाठी वाव मिळावा यासाठी IRCTC सर्वोत्तम टूर्स ऑफर देत आहे. लोकांना कधी हिमालय, कधी दक्षिण भारत तर कधी धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी अनेक स्वस्त टूर पॅकेज आणत राहतात, ज्यामुळे लोकांचे प्रवासाचे स्वप्न देखील पूर्ण होते.

IRCTC Honeymoon Package
IRCTC Tour Package: 5,380 रुपयात फिरा राजस्‍थान ; 3 दिवसाचा खर्च उचलणार IRCTC

आता नवे लग्न झालेल्या जोडप्यांसाठी IRCTC ने बेस्ट ऑफर आणली आहे. नव्या पार्टनरसोबत अंदमान आणि निकोबारला जाण्याचा प्लॅन करत असाल तर IRCTCची ही स्कीम तूमच्या कामाची आहे.

IRCTC Honeymoon Package
Diwali Package Food :१०० रुपयात ४ वस्तूंचं दिवाळी पॅकेज ही निव्वळ घोषणा? नेमकी परिस्थिती काय?

अंदमान आणि निकोबारचा प्लॅन करणाऱ्यांसाठी हा बेस्ट प्लॅन आहे. तुम्हालाही लग्नानंतर जोडीदारासोबत अंदमानला जायचे असेल तर IRCTC च्या मदतीने तुम्ही हे स्वप्न पूर्ण करू शकता. या टूर पॅकेजला 'मेस्मेरायझिंग अंदमान' (Mesmerizing Andaman) असे नाव देण्यात आले आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही 5 दिवस आणि 6 रात्री अंदमान आणि निकोबारमध्ये घालवू शकता.

IRCTC Honeymoon Package
Honeymoon Destinations : हिवाळ्यात हनिमूनसाठी उत्तम आहेत ही ठिकाणे

या महान टूर पॅकेजची सुरुवात लखनऊ येथून होणार आहे. 4, 16, नोव्हेंबर, 5 जानेवारी आणि 23 मार्च 2023 यावेळी लखनऊहून अंदमानसाठी फ्लाइट उड्डाण भरेल. या आलिशान टूर पॅकेजमध्ये तुम्ही पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक बेट आणि बारातंग सारख्या बेटांवरील नयनरम्य ठिकाणांना भेट देण्याचा आनंद घेऊ शकता.

IRCTC Honeymoon Package
Honeymoon Destinations: हनिमूनसाठी 'ही' आहेत उत्तम ठिकाणे

या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण यासारख्या सुविधा यात दिल्या जातील. अंदमानमध्ये हॉटेल आणि फिरण्यासाठी बससेवाही दिली जाणार आहे. या पॅकेजनूसार एका व्यक्तीला या प्रवासाला जायचे असेल तर तुमचा खर्च 72,280 रुपये येईल. जर 2 व्यक्ती एकत्र टूर पॅकेजवर जात असतील तर तुमचा खर्च 57,840 रुपये असेल. जर 3 व्यक्ती असतील तर तूम्हाला 55,870 इतका खर्च आहे.

IRCTC Honeymoon Package
Honeymoon Destinations: नोव्हेंबरमध्ये हनिमूनला जाण्यासाठीची सर्वोत्तम ठिकाणे कोणती?

पॅकेजमध्ये काय काय असेल

- 3 स्टार हॉटेल्समध्ये 5 दिवस राहण्याची सोय.

- जेवण,नाश्ता आणि पिण्याचे पाणी

- प्रवासी विमा

- परमिट शुल्क आणि हॉटेल टॅक्स

- पोर्ट ब्लेअर-हॅवलॉक-पोर्ट द्वारे लक्झरी एसी क्रूझ

- स्पीड बोटचा प्रवास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.