IRCTC News : नव्या वर्षाचं स्वागत दणक्यात करायचयं? IRCTC घेऊन आलंय भन्नाट पॅकेज

जर तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत न्यू इयरला फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर भारतीय रेल्वेने आकर्षक टूर पॅकेज आणलं आहे. जाणून घ्या
IRCTC News
IRCTC News esakal
Updated on

IRCTC Tour Package : जर तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत न्यू इयरला फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर भारतीय रेल्वेने आकर्षक टूर पॅकेज आणलं आहे. लगेच टूर बुक करा आणि नवीन वर्ष गोवा, उज्जैन, नाशिकमध्ये साजरा करा. बरेच लोक नवीन वर्ष साजरं करण्यासाठी बाहेरगावी, रोमँटिक जागी जाणं पसंत करतात. त्यांच्यासाठी रेल्वेने हा सोपा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. टूर बुक करण्यासाठी IRCTC च्या संकेत स्थळावर संपर्क साधावा.

काय आहे पॅकेज

रेल्वेच्या या टूरचं पॅकेज ९ दिवस १० रात्रींसाठी आहे. या टूरचं नाव ‘New Year Bonanza’ असं देण्यात आलं आहे. 'बघा आपला देश' या अभियानांतर्गत हे पॅकेज सुरू करण्यात आलं आहे. भारत गौरव टूरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून प्रवासी उज्जैन, नाशिक आणि गोवा फिरू शकतात आणि नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत करू शकतात.

हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

कधी सुरू होणार

हे न्यू इयर टूर पॅकेज दिल्लीहून २३ डिसेंबरपासून सुरू होईल. यात प्रवाशांना उज्जैनमध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर मंदिर, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर, साईबाबा मंदिर तर गोव्यात कलंगुट बीच, बागा बीच, अगौडा फोर्ट बघायला मिळणार आहे. याशिवाय गोव्यात जुनं गोवा चर्च, मंगेशी मंदिर, मीरमारा बीच, कोलवा बीच फिरायला मिळेल.

IRCTC News
IRCTC Gujrat Package : केवळ सतरा हजारात फिरा गुजरात; 9 दिवसाचे पॅकेज ऐकाल तर त्वरीत बुकिंग कराल

काय मिळणार सुविधा?

या टूरमध्ये प्रवाशांना नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण मिळेल. टूर दरम्यान IRCTC कडून चांगल्या हॉटेल्समध्ये उतरवलं जाणार आहे. मक्कामाच्या ठिकाणी प्रवाशांना तिथले स्पॉट्स फिरवण्यासाठी बस नियोजित केलेली असणार आहे.

IRCTC News
IRCTC Honeymoon Package : हनिमूनसाठी अंदमानची टूर बजेटमध्ये; IRCTC ने आणले नवे पॅकेज

तिकीट किती असणार ?

या टूर पॅकेजच्या कंफर्ट क्लासच्या सिंगल प्रवाशासाठी ६६ हजार ४१५ रुपये, २-३ लोकांसोबत प्रवास करण्यासाठी प्रती व्यक्ती ५७ हजार ७५० रुपये खर्च येणार आहे. तर सुपिरीयर क्लासने प्रवास करण्यासाठी प्रती व्यक्ती ७९ हजार ६९५ रुपये तर दोन माणसांसोबत प्रवास करण्यासाठी ६९ हजार ३०० रुपये खर्च येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.