IRCTC Tour Package: 5,380 रुपयात फिरा राजस्‍थान ; 3 दिवसाचा खर्च उचलणार IRCTC

राजस्थान मध्ये फिरण्यासारखी अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत.
IRCTC Tour Package
IRCTC Tour PackageEsakal
Updated on

“आवोजी, पधारो म्हारो देश” म्हणत राजस्थानची माती तूमचे स्वागत करायला नेहमीच तयार आहे. भव्यदिव्य राजमहाल, पुष्करण्या, भव्य किल्ले वाळवंट, उंट आणि कला व संगीताचा अजोड मिलाफ म्हणजे राजस्थान. राजस्थान जितका त्याच्या रंगबिरंगी पोशाख आणि पगडी साठी प्रसिद्ध आहे तितकाच राजस्थानी संगीतासाठी देखील प्रसिद्ध आहे.

राजस्थानमधील फिरण्यासारखी अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे नवरात्रीच्या सुट्टीत फिरायला जायचा प्लॅन बनवत असाल तर तूमच्यासाठी एक गुडन्युज आहे. IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) ने तूमच्यासाठी एक खास पॅकेज आणले आहे. IRCTC  3 दिवस आणि 2 रात्रीचे पॅकेज फक्त 5380 रुपयांमध्ये देत आहे. या पॅकेजचा फायदा घेऊन तुम्ही राजस्थान ट्रीप फायनल करा.

IRCTC Tour Package
Navratri Festival : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांच्या मूर्तींचे : शहरवासीयांना घडणार दर्शन

IRCTC चे हे पॅकेज 3 सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. या पॅकेजमध्ये स्टँडर्ड, डिलक्स आणि लक्झरी अशा तीन भागात विभागले आहे. या पॅकेजची सुरूवात 5,380 रुपयांपासून होत असून त्यामध्ये उदयपूरला राहणे, जेवण आणि प्रवास खर्च यांचा समावेश आहे. 

● आता बघू या काय असेल पॅकेजमध्ये?

या पॅकेजमध्ये तुम्हाला हॉटेलमध्ये राहण्याचा, नाश्ता आणि जेवणाचा खर्च केला जाईल. याशिवाय उदयपूरमध्ये फिरण्यासाठी वाहनाचा खर्चही यातूनच केला जाईल. तुम्हाला उदयपूरमधील रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावरून पिकअप आणि ड्रॉपची सुविधा असेल. जर तुम्हाला या पॅकेजचा लाभ घ्यायचा असेल तर ते IRCTC वेबसाइटवर बुक करता येईल.

IRCTC Tour Package
Navratri 2022: साडेतीन शक्तीपीठाचा इतिहास नेमका काय आहे?

● कसे असतील तीन दिवस

या पॅकेजची सुरूवात उदयपूरपासून होईल. IRCTC तुम्हाला उदयपूर रेल्वे स्टेशन, बस स्टँड, विमानतळ, हॉटेल किंवा तुम्ही असाल तिथून पिक करेल. यानंतर तुम्हाला सिटी पॅलेसमध्ये बोट रायडिंग दिली जाईल. संध्याकाळी हॉटेलमध्ये मुक्काम होईल.  दुस-या दिवशी न्याहारी करून एकलिंगजी हल्दीघाटी आणि नाथद्वारचे दर्शन करवले जाईल. त्यानंतर पुन्हा हॉटेलमध्ये मुक्काम करून तिसऱ्या दिवशी तुम्हाला कुंभलगड किल्ल्यावर नेले जाईल. त्यानंतर तुम्हाला रेल्वे स्टेशन, विमानतळ, बस स्टँड किंवा हॉटेलमध्ये सोडले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.