June Travel Places : जूनमध्ये फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करताय? मग, थंड हवेच्या ‘या’ सर्वोत्तम ठिकाणांना द्या भेट

June Travel Places : जूनमध्ये उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता. भारतात अशी थंड हवेची ठिकाणे अनेक ठिकाणे आहेत.
June Travel Places
June Travel Placesesakal
Updated on

June Travel Places : भारतातील अनेक भागांमध्ये सध्या उष्णतेची भीषण लाट निर्माण झाली आहे. काही राज्यांमध्ये तीव्र उष्माघातामुळे अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे, या वाढत्या उष्णतेमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये मुलांच्या शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी असते. त्यामुळे, मुलांना घरात राहावेसे वाटत नाही. त्यांना, या सुट्ट्यांमध्ये फिरायला जायचे असते.

परंतु, एवढ्या उन्हात मुलांना कुठे फिरायला न्यायचे? याची चिंता पालकांना सतावते. या तीव्र उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी कुटुंबासोबत, जोडीदारासोबत आणि मुलांसोबत तुम्ही फिरायला जाऊ शकता. भारतात अशी थंड हवेची ठिकाणे अनेक ठिकाणे आहेत.

जिथे तुम्हाला उष्णतेपासून आराम मिळेल आणि तुम्ही सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेऊ शकाल. जूनमध्ये सभोवतालचे वातावरण आल्हाददायक असते, त्यामुळे, तुम्हाला उष्णतेचा फार त्रास होणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात भारतातील या ठिकाणांबद्दल.

June Travel Places
Travel Diaries : निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या..! काय झाडी..काय डोंगार, पाहायला इथं जावच लागतंय

तवांग

ईशान्य भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून तवांगला ओळखले जाते. हे एक सुंदर हिलस्टेशन आहे. अरूणाचल प्रदेशमध्ये हे ठिकाण स्थित आहे. सध्या तवांगचे कमाल तापमान १९ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ९ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. त्यामुळे, भर उन्हाळ्यात ही येथील वातावरण थंड आहे.

या थंड वातावरणामध्ये तुम्ही कुटुंबासोबत, मुलांसोबत आणि जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता. तवांगमध्ये तुम्हाला बर्फाळ प्रदेश, दऱ्याखोऱ्यांचा भाग आणि उंच झाडांचा नजारा पहायला मिळेल. यासोबतच येथील प्रेक्षणीय स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता.

लेह लडाख

जून महिन्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. या महिन्यात तुम्हाला केवळ उष्णतेपासून आरामच नाही तर कडाक्याच्या थंडीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही लेह, लडाखला भेट देऊ शकता. भर उन्हाळ्यात तुम्हाला येथे थंड वातावरणाचा आनंद घेता येईल. लेह, लडाखमधील प्रेक्षणीय स्थळे, दऱ्याखोऱ्यांचा सुंदर प्रदेश, आणि नयनरम्य तलावांना ही तुम्ही भेट देऊ शकता. जूनमध्ये तुम्ही कुटुंबासोबत, मुलांसोबत या ठिकाणी निवांत वेळ घालवू शकता.

हेमकुंड

उत्तराखंड राज्यात स्थित असलेले हे हेमकुंड पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. जूनमध्ये महिन्यात हेमकुंडचे कमाल तापमान ९ अंश सेल्सिअसच्या आसपास असते. त्यामुळे, उन्हाळ्यात तुम्ही या ठिकाणी कुटुंबासोबत, मुलांसोबत फिरण्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता. जूनमध्ये या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन जरूर करा.

June Travel Places
Healthy Snacks During Travelling : उन्हाळ्यात प्रवास करताना ‘हे’ हेल्दी खाद्यपदार्थ ठेवा सोबत, अनेक समस्यांची होईल सुट्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.