'कास पठार'ला जायचा प्लॅन आहे? मग, ही बातमी आपल्यासाठी महत्वाची!

Kaas Pathar
Kaas Patharesakal
Updated on

कास (सातारा) : जागतिक वारसास्थळ कास पठारावरील (Kaas Plateau Season) रंगीबेरंगी रान फुलांचा फुलोत्सव पंचवीस ऑगस्टपासून खुला झाला असून पहिल्याच दिवशी दोनशे जणांनी शंभर रुपये शुल्क भरून कास पठार पाहिले. सद्यस्थितीत 31 ऑगस्टपर्यंत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला ऑफलाइन पद्धतीने प्रवेश दिला जाणार असून एक सप्टेंबर पासून ऑनलाइन पद्धतीनेच बुकिंग (Online Booking) केलेल्या पर्यटकांना पठारावर प्रवेश दिला जाणार आहे.

Summary

जागतिक वारसास्थळ कास पठारावरील रंगीबेरंगी रान फुलांचा 'फुलोत्सव' पंचवीस ऑगस्टपासून खुला झाला आहे.

पर्यटकांना बुकिंगसाठी www.kas.ind.in या वेबसाइटवर जावून आगावू प्रवेश शुल्क भरून अगोदरच बुकिंग करावं लागणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे पठारावरील फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. मात्र, यावर्षी कोरोनाचे नियम पाळून हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. प्रति पर्यटक १०० रुपये प्रवेश शुल्क आकारला जात आहे. पहिल्या दिवशी 200 च्या वरती पर्यटकांनी कास पठारला भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटला. समितीने १४० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची हंगामासाठी नेमणूक केली असून वाहनतळ, पिण्याचे पाणी, शौचालय, निवारा शेड, तिकीट घर, गाईड आदी व्यवस्था सुरळीत केल्या आहेत.

Kaas Pathar
पर्यटकांना खुशखबर! कास पठार 'खुले', समितीकडून हंगामाची तयारी पूर्ण
Kaas Pathar
Kaas Pathar

पठारावर वाहन नेण्यास मनाई असल्याने वाहनतळ ते पठार अशी बससेवा समितीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलीय. कास पठाराबरोबरच पर्यटक परिसरातील बोटिंगसाठी प्रसिद्ध असलेले बामणोली, सर्वात उंच धबधबा म्हणून प्रसिद्ध असणारा वजराई धबधबा, एकीवचा धबधबा, नारायण महाराज मठ शेंबडी, सह्याद्रीनगरमधील पवनचक्की प्रकल्प इत्यादी परिसरातील पर्यटन स्थळांना पर्यटक भेटी देत आहेत. ऊन-पावसाचा खेळ, धुके या आल्हादायक वातावरणामुळे परिसरातील निसर्ग खुलला असून धरतीवरील हा स्वर्ग पर्यटनासाठी नटला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.