Kargil Travel Destinations : भारत देश स्वातंत्र्य झाला तरी पाकिस्तानी कुरघोड्यांना आपण आजही प्रत्युत्तर देतो. त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे कारगिल. कारगिलचं नाव ऐकताच आपल्या मनात 1999 सालच्या आठवणी ताज्या होतात.
खरं तर भारत-पाकिस्तान युद्धातून आपण कारगिलला ओळखतो. कारगिल वॉर मेमोरियल पाहण्यासाठी बहुतेक लोक येतात, पण या व्यतिरिक्त इथे बरंच काही आहे. उंच डोंगर, तलाव आणि हिमनद्यांचे सुंदर दृश्य पाहून तुमचे मन प्रसन्न होईल.
वॉर मेमोरियलव्यतिरिक्त आम्ही तुम्हाला कारगिलच्या इतर सुंदर ठिकाणांची सफर घडवून आणतो. या ठिकाणचे सुंदर नजारे पाहून तुम्हालाही या ठिकाणांना भेट द्यावीशी वाटेल. (Kargil)
सुरु व्हॅली
कारगिलपासून काही अंतरावर सुरू खोरे आहे. हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. डोंगरातून वाहणाऱ्या नदीचा आवाज आणि अंगावर शहारा आणणारा थंडगार वारा प्रत्येकालाच हवाहवासा वाटेल. येथे तुम्हाला काही मठ आणि सुंदर गावे पाहण्याची संधी ही मिळणार आहे.
लामायुरू मठ
लेहपासून सुमारे १२७ किमी अंतरावर असलेला लामायुरु मठ हे येथील मुख्य आकर्षण आहे. काश्मिरी शैलीतील बौद्ध पुतळे येथे आहेत. या मठात वर्षातून दोनदा मास्क डान्स फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते, जे पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. खास या फेस्टसाठीच अनेक लोक इथे गर्दी करतात.
मिनामार्ग
द्रासपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर मिनामार्ग नावाचे सुंदर ठिकाण आहे. आकाशात तरंगणारे ढग आणि पर्वतांचे सुंदर दृश्य तुमच्या मनाला भुरळ घालेल. ही दरी माचोई ग्लेशियरने (हिमनदी) वेढलेली आहे. माचोई हिमनदी एक ९ किलोमीटर लांब हिमालय पर्वत श्रेणीच्या ईशान्यभागात वसलेली हिमनदी आहे. निसर्गप्रेमींना हे ठिकाण खूप आवडणारे आहे.
कारगिलला कसं जायचं?
कारगिल एक्सप्लोर करायचं असेल तर बाईक किंवा टॅक्सीने प्रवास करावा, कारण कारगिलला जाताना मधला मार्ग तर आणखीच सुंदर असतो. येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून दुचाकीस्वार कारगिल ला भेट देण्यासाठी येतात.
विमानतळ
कारगिलच्या सर्वात जवळचा विमानतळ श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जो कारगिल शहरापासून सुमारे २२५ किमी अंतरावर आहे. याशिवाय दिल्लीपासून एक तासाच्या अंतरावर असलेल्या लेहलाही तुम्ही विमानाने जाऊ शकता. लेहहून तुम्ही रोड ट्रिपप्लॅन करून कारगिलला जाऊ शकता, मधलं लोकेशन तुमचा प्रवास आणखी चकाचक करेल.
बस : जर तुम्ही कारगिल बसने जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही श्रीनगरला जाणारी बस पकडू शकता. श्रीनगरहून भाड्याच्या टॅक्सी किंवा बसने तुम्ही कारगिलला जाऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.