Transport Board : आता स्वस्तात मस्त पाहा धबधबे; परिवहन मंडळानं जारी केली पॅकेज टूर, 'हे' धबधबे पाहता येणार

बसस्थानकावरून पॅकेज टूरअंतर्गत पर्यटकांना जलद बसची सोय करून देण्यात येणार आहे.
Gokak Falls Amboli
Gokak Falls Amboliesakal
Updated on
Summary

शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवासाची सुविधा या बससाठी नसेल.

बेळगाव : संततधारेमुळे जिल्ह्यातील हिडकल धरण (Hidkal Dam), गोडचिनमलकी, गोकाक व महाराष्ट्रातील आंबोली येथील धबधबे प्रवाहित झाले आहेत. पर्यटकांना (Tourists) धबधब्यांचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी राज्य परिवहन मंडळाने बससुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी बससेवा उपलब्ध असेल. २२ जुलै ते २७ ऑगस्टपर्यंत बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावरून पॅकेज टूरअंतर्गत पर्यटकांना जलद बसची सोय करून देण्यात येणार आहे.

Gokak Falls Amboli
Hidkal Dam : हिडकल जलाशयात 1928 मध्ये उभारलेलं विठ्ठल-रखुमाई मंदिर अखेर पाण्याखाली; धरणात दर्शनासाठी होत होती गर्दी

पॅकेज १ मध्ये बेळगाव - हिडकल डॅम-गोडचिनमलकी-गोकाक फॉल्स (Gokak Falls) यांचा समावेश आहे. बेळगावहून सकाळी ९ वाजता सुटून १० वाजता हिडकल डॅम येथे पोचेल. हिडकल डॅम येथून ११ वाजता सुटून ११.३० वाजता गोडचिनमलकीला पोचेल. तेथून १ वाजता सुटून १.३० वाजता गोकाक फॉल्सला पोचेल.

गोकाक फॉल्स येथून दुपारी ४ वाजता सुटून सायंकाळी ६ वाजता बस बेळगावला पोचेल. पॅकेज १ मधील पर्यटन स्थळांवरील प्रवासासाठी ( जाणे येण्यासह ) माणसी १९० रुपये तिकीट दर असेल. शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवासाची सुविधा या बससाठी नसेल.

Gokak Falls Amboli
Irshalwadi Landslide : दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; CM शिंदेंची मोठी घोषणा

पॅकेज २ मध्ये बेळगाव - आंबोली (नांगरतासमार्गे) असेल. बेळगावहून सकाळी ९ वाजता बस सुटून ११ वाजता नांगरतासला पोचेल. तेथून दुपारी १२ वाजता सुटून १२.३० वाजता आंबोलीला पोचेल. तेथून ४ वाजता सुटून सायंकाळी ६ वाजता बस बेळगावला पोचेल. या प्रवासासाठी ( जाणे - येण्यासह ) माणसी २९० रुपये तिकीट दर असेल.

Gokak Falls Amboli
पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? आंबेडकरांच्या स्वागत कमानीला विरोध; मिरजेच्या दीडशे कुटुंबांनी सोडलं गाव

बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावर आरक्षणाची व्यवस्थाही उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी मध्यवर्ती बसस्थानका संपर्क साधावा, असे आवाहन वायव्य कर्नाटक परिवहन संस्थेच्या (North West Karnataka Transport Corporation) वरिष्ठ विभागीय नियंत्रकांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.