Tourism : केरळमधील 'ही' खास पर्यटन स्थळे पाहिलाय का?

सप्टेंबर महिना हा खास पावसाळ्या नंतरच्या पर्यटनासाठी ओळखला जातो.
Tourism : केरळमधील 'ही' खास पर्यटन स्थळे पाहिलाय का?
Updated on

सध्या पावसाचा जोर कमी आहे. काही ठिकाणी पावसाची बॅटिंग सुरु असली तरी काही ठिकाणी मात्र अगदी रिमझिम पाऊस सुरु आहे. दरम्यान, या वातावरणात अनेकजण एखाद्या नवीन ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. सप्टेंबर महिना हा खास पावसाळ्या नंतरच्या पर्यटनासाठी ओळखला जातो.

पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी नयनरम्य वातावरण निर्माण झालेले असते. याचा आनंद घेण्यासाठी अनेक हौशी पर्यटक ट्रिपसाठी बाहेर पडतात. दरम्यान, अनेकांना या वातावणात निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचा आनंद घ्यायचा असतो. त्यामुळे ते केरळसारख्या ठिकाणी भेट देण्याचा प्लॅन करत असतात.

Tourism : केरळमधील 'ही' खास पर्यटन स्थळे पाहिलाय का?
Food : रेस्टॉरंट स्टाईलचे कुरकुरीत पालक पत्ता चाट, घरीच बनवा सोपी रेसिपी

प्रवास आणि उत्साही लोक सहसा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी प्रवास करण्याच्या विचारात असतात. अनेकांना साहसी, निसर्, जंगल, पर्वत, नद्या अशी ठिकाणे आवडतात. अनेकांना निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असतो. त्यामुळे अशी लोक निसर्गाच्या कुशीत वसलेली काही शहर शोधत असतात. तुम्हीही असा कोणता प्लॅन करत असाल तर केरळ हे तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. एक अविस्मरणीय सहलीसाठी तुम्ही केरळला भेट देऊ शकता.

अल्लपी

अल्लपीला व्हेनिस ऑफ इंडिया असे म्हटंले जाते. हे शहर बॅक वॉटरसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही हाऊसबोटमध्ये रात्र घालवू शकता. तसेच वेलनेस सेंटर्स, रिसॉर्ट आणि आयुर्वेद स्पा प्रसिद्ध आहेत.

Tourism : केरळमधील 'ही' खास पर्यटन स्थळे पाहिलाय का?
Health News : सकाळी उठल्यावर थकवा जाणवतोय? कोणते उपाय कराल पहा..

वर्कला

अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले वर्कला हे छोटेसे शहर आहे. जिथे तुम्ही पॅरोग्लायडिंग घोडेस्वारी, सर्फिंग आणि बोट राईडिंगचा आनंद घेऊ शकता.

मुन्नार

मुन्नारमध्ये सुंदर दऱ्या आणि हिल स्टेशन्स आहेत. हे ठिकाण हनिमूनसाठी एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही येथे ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.

वायनाड

वायनाड हे एक सुंदर शांत ठिकाण आहे. टेकड्या, वळणदार दऱ्यांमध्ये फिरणे, धबधबे आणि गुहा पाहणे हा एक रोमांचक क्षण असेल, तुम्ही येथे कॅम्पिंग, ट्रेकिंगचाही आनंद घेऊ शकता.

कोची

कोचीला अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखले जाते. हे शहर कोचीच्या बंदरासाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही हिरवेगार जंगल आण समुद्रकिनारे आणि टेकड्यांमध्ये फिरु शकता.

Tourism : केरळमधील 'ही' खास पर्यटन स्थळे पाहिलाय का?
दुर्दैवी! हुंड्याच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

पेरियार राष्ट्रीय उद्यान

पेरियार नॅशनल पार्क हे केरळमधील खास पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे उद्यान पेरियार सरोवराच्या काठावर आहे. येथे तुम्ही बोट क्रूझचा आनंद घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()