बंजी जम्पिंगची आवड आहे? मग, या 5 साहसी ठिकाणांना जरुर एकदा भेट द्या..

know some best bungee jumping places in India Marathi article
know some best bungee jumping places in India Marathi article
Updated on

जगभरातील बऱ्याच लोकांना साहसी खेळ खूप आवडतात. या अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये बंजी जम्पिंगचे नावही अव्वल स्थानावर आहे. तुम्हालाही बंजी जम्पिंग आवडत असेल, तर आम्ही तुम्हाला अशीच काही ठिकाणे सांगणार आहोत, जिथे तुम्ही बंजी जम्पिंगचा आनंद घेऊ शकता..

ऋषिकेश : ऋषिकेशच्या मोहन चट्टीमध्ये एक बंजी जम्पिंग स्पॉट असून या ठिकाणी बंजी जम्पिंगसाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, जे पृष्ठभागापासून 83 मीटर उंच आहेत. सध्या बंजी जम्पिंगचे भाडे सुमारे 3550 रुपये इतके आहे. मात्र, लॉकडाउननंतर भाडे दरात बदल होऊ शकतो. तेथील सुविधांनुसार, आपण बारगेनिंग देखील करू शकता.

जगदलपूर : छत्तीसगडमधील जगदलपूरमध्ये बंजी जम्पिंग अ‍ॅडव्हेंचर ही रसिकांसाठी खूप चांगली जागा आहे. जर आपल्याला उंचीवरून बंजी जम्पिंग करण्याची इच्छा नसेल, तर हे ठिकाण योग्य आहे. कारण, त्याची उंची फक्त 30 मीटर इतकीच आहे. तसेच, याचा खर्चही जास्त नाही. यासाठी आपल्याला प्रति व्यक्ती केवळ 300 रुपये द्यावे लागतील.
 
गोवा : जर आपल्याला बंजी जम्पिंगची आवड असेल, तर आपण गुरुत्वाकर्षण झोनमध्ये एकदा उडी मारण्याचा आनंद घ्यावा. अंजुना बीचवर आपल्याला हे ठिकाण सहज सापडेल. आपण येथे 25 मीटरच्या शिखरावरुन उडी मारू शकता. त्याचे भाडे फक्त 500 रुपयांपासून सुरू होते.

लोणावळा : पुण्याच्या हद्दीत असलेलं लोणावळा हे एक सुंदर हिल स्टेशन असून बंजी जम्पिंगसाठीही हे प्रसिद्ध ठिकाण आहे. लोणावळा हे भारतातील एक उत्कृष्ट आणि सुरक्षित बंजी जम्पिंग स्पॉट आहे. मुंबई, पुण्यात राहणाऱ्या लोकांसाठी ही सर्वात जवळची जागा असून याचे भाडे 1500 ते 2000 पासून सुरू होते.

बंगलुरू : बंगळुरुमधील सर्वात रोमांचक खेळ म्हणजे, बंजी जम्पिंग. हा साहसी खेळ कांतीरवा स्टेडियममध्ये होतो. जिथे उपकरणे क्रेनसह 130 फूट उंचीवर बसवितात, तर उडीची उंची 80 फूट असते. या जम्पिंगचा आनंद घेण्यासाठी आपल्याला फक्त 400 रुपये मोजावे लागतात.

टीप : बंजी जम्पिंगसाठी भाड्याच्या दरात बदल होऊ शकतो, म्हणून सुविधांनुसार करार सुनिश्चित करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.