या Highway वर आकारला जातो Two Wheeler ना टोल....

toll for two wheeler: बाईकसाठी अनेक महामार्गांवर वेगळा रस्ता किंवा वेगळी लेन असूनही बाईकस्वारांसाठी टोल माफ का किंवा टोल का नाही? असा सवाल अनेकांना पडत असेल. याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत
why two wheelers don't pay toll
why two wheelers don't pay tollEsakal
Updated on

toll for two wheeler: लॉन्ग ड्राइव्हला जाणं अनेकांना आवडतं. काहींना कारने प्रवास करणं आवडतं तर काहींना बाईक रायडिंगमध्ये अधिक मजा येते. खरं तर दोन्ही वाहनांच्या प्रवासाची Travel किंवा ड्रायव्हिंगची वेगवेगळी मजा आहे. Know why toll tax is not charged on Bikes on c Highways

अनेकादा दूरचा प्रवास करत असताना तुम्हाला विविध जिल्ह्यांच्या किंवा राज्यांच्या सीमा ओलांडाव्या लागतात. मोठ्या हायवेवरून Highway प्रवास करावा लागतो. दूरच्या प्रवासामध्ये वाटेत तुम्हाला अनेकदा टोल Toll भरावा लागतो.

प्रत्येक महामार्गावरील प्रवासासाठी वेगवेगळा टोल आकारला जातो. मात्र बाईकस्वारांना राज्यातच नव्हे तर देशात कोणत्याच टोलनाक्यावर टोल Toll Tax भरावा लागत नाही. तर याउलट कार असो किंवा ट्रक, जीप, ट्रॅक्टर अगदी कंटेनरलाही रोड टॅक्स म्हणजेच विविध ठिकाणी टोल भरावा लागतो.

बाईकसाठी अनेक महामार्गांवर वेगळा रस्ता किंवा वेगळी लेन असूनही बाईकस्वारांसाठी टोल माफ का किंवा टोल का नाही? असा सवाल अनेकांना पडत असेल. याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

टोल टॅक्स का द्यावा लागतो?

बाईकला टोल का द्यावा लागत नाही हे जाणून घेण्यापूर्वी आपण टोल टॅक्स का द्यावा लागतो हे जाणून घेऊ. मुळात टोल टॅक्स हा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आकारला जात नसून तो आपण ठराविक रस्त्यावर किंवा महामार्गावर वाहन चालवल्यामुळे आकारला जातो.

एखादा रस्ता किंवा महामार्ग तयार करण्यासाठी शासनाकडून किंवा संबंधित प्रशासनाकडून जो मोठा खर्च केला जातो, तो या टोल टॅक्सच्या मार्फत वसूल करण्यात येतो. यासाठीच टोलचा ठराविक कालावधी ठरलेला असतो.

रस्ता किंवा महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाल्यानंतर साधारण १०-१५ वर्षांत किंवा रस्ते निर्मितीची रक्कम ठराविक टक्क्यांपर्यंत वसूल होईपर्यंत टोल आकारला जातो.

हे देखिल वाचा-

why two wheelers don't pay toll
Samruddhi Highway : ‘समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी ‘आयटीएमएस’ सिस्टीम

बाईक, टू व्हिलर वाहनधारकांकडून टोल का आकारला जात नाही?

बाईक किंवा इतर कोणत्याही टू व्हिलर वाहनांसाठी टोल माफ असण्याचं मुख्य कारण म्हणजे वजन, कार किंवा इतर अवजड वाहनांच्या तुलनेत टू व्हिलर वाहन हे हलकं असतं. टोल हा रस्ते निर्मितीनंतर त्याच्या मेंटेंन्सससाठी देखील येणाऱ्या खर्चासाठी वसूल केला जातो.

म्हणूनच प्रत्येक वाहनांसाठी वेगवेगळा टोल आकारला जातो. कारच्या तुलनेत अवजड वाहनांसाठी अधिक टोल आकारला जातो. तर बाईक, स्कूटर आणि सायकल हे वजनाने अत्यंत हलके असल्याने त्यांना टोल माफ असतो.

बाइक-स्कूटर हे मध्यमवर्गीयांचं वाहन

बाईक किंवा स्कूटर हे मध्यमवर्गीयांचं वाहन असल्यास गृहित धरून शासन मध्यमवर्गीयांवर अधिक पैशांचा ताण येऊ नये म्हणून टू व्हिलरसाठी टोल माफ करते. तसंच अनेक नॅशनल हायवेवर बाईक चालवण्यासाठी मुळातच परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना टोल देण्याचा प्रश्नच उरत नाही.

देशातील या हायवेवर टू व्हिलरलाही लागतो टोल

भारतात आता मोठ्या पातळीवर नवनवे एक्सप्रेस वे तयार होत आहेत. ज्यामुळे दूरवरच्या राज्यांना कमी वेळेत जोडलं जाणार आहे. यापैकीच एक असलेल्या यमुना एक्सप्रेसवेवर टू व्हिलर्स वाहनांवरदेखील टोल आकारला जातो.

हे देखिल वाचा-

why two wheelers don't pay toll
Trilateral Highway : आता गाडीने थेट जा थायलंड-बँकॉकला; भारतापर्यंत येणार हायवे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.