मुंबई-पुण्यातील धावपळीपासून दूर, नीरव शांतता अनुभवत समुद्राच्या साक्षीने दिवाळीचा आनंद घेता यावा म्हणून दरवर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणावर कोकणात येतात.
रत्नागिरी : दिवाळीच्या सुट्यांसाठी (Diwali Holiday) पर्यटकांनी (Tourists) कोकणला पसंती दिली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील परिसरातून कोकणामध्ये सुमारे २ ते ३ लाख पर्यटक दाखल होतील, असा अंदाज पर्यटन विभागाने वर्तवला आहे.