Mhatari Pathar : वाऱ्याच्या मंद झुळका अन् ऊन-पावसाचा खेळ.. 'या' पठारावरचा फुलोरा डोळ्याचं पारणं फेडतोय

श्रावणातली फुले पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
Mhatari Pathar Bhudargad Kolhapur
Mhatari Pathar Bhudargad Kolhapuresakal
Updated on
Summary

नाना रंगाची ही उधळण मनाला गुंग करून टाकते. जिकडे पाहावे तिकडे फुलेच फुले आहेत.

पिंपळगाव : वाऱ्याच्या मंद झुळका, सतत उतरणारे ढग आणि त्यातून कधी कधी पडणारा पाऊस अन् मधूनच येणारी उन्हं यांचा सुंदर मिलाफ म्हातारीच्या पठारावर (Mhatari Pathar) अनुभवायला मिळत आहे.

Mhatari Pathar Bhudargad Kolhapur
Kaas Pathar : कास पठारावर निर्सग बहरला; रंगीबेरंगी फुलांची उधळण एक सप्टेंबरला?

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील (Bhudargad Kolhapur) नव्याने चर्चेत आलेले हे पर्यटन स्थळ. आता त्यात भरीत भर म्हणून या पठारावर आलेला फुलोरा डोळ्याचे पारणे फेडतो आहे. या फुलांच्या रुपाने ईश्वराने या पठारावर जणू पिवळ्या निळ्या, आभाळी अशा नाना रंगाची जणू उधळणच केली आहे.

नाना रंगाची ही उधळण मनाला गुंग करून टाकते. जिकडे पाहावे तिकडे फुलेच फुले. या फुलांच्या ताटव्यात अलगद पावले पडताना जणू स्वर्गाच्याच दरबारात आहोत की काय, अशी अनुभूती येते. सध्या शाळा महाविद्यालये यांच्या शैक्षणिक वर्षा सहली पठारावर येत आहेत.

Mhatari Pathar Bhudargad Kolhapur
Kolhapur : 'मराठ्यांशी दुश्मनी करणाऱ्या त्या अधिकाऱ्याच्या छाताडावर नाचू'; मराठा संघटना-जिल्हाधिकाऱ्यांत जोरदार खडाजंगी

वेगवेगळे स्थलांतरित प्रवाशी पक्षी या पठारावर दाखल झाले आहेत. श्रावणातली फुले पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सध्या कळाई, नाल, कडवी, डोलारा, उडी चिरायत, निळी पापणी, कवला केना ही रानफुले फुलली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.