भारतात अनेक मंदिरे अशी आहेत जी आपल्याला आश्चर्यचकीत करतात. आपल्याला गुरूत्वाकर्षणाचा नियम माहिती आहे, पृथ्वीपासून दूर गेलेली वस्तू तितक्याच वेगाने खाली येते. पण, भारतातील एक मंदिर असे आहे जिथल्या काही गोष्टींना हा नियम लागू होत नाही.
आपण ज्या मंदिराबद्दल माहिती घेणार आहोत ते मंदिर आंध्र प्रदेशात आहे. लेपाक्षी मंदिर हे प्राचीन भारतातील स्थापत्य कलेचे अप्रतिम उदाहरण आहे. लेपाक्षी मंदिर हे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात स्थित एक प्राचीन हिंदू मंदिर आहे.
या मंदिरात एक खांब आहे. हा खांब साधा नाही तर, तो हवेत तरंगणारा आहे. हा खांब जमिनीपासून थोडा वर उभा आहे आणि मंदिराच्या वजनालाही आधार देतो. त्यामुळे या मंदिराचे रहस्य जाणून घेण्यासाठी दूर-दूरवरून पर्यटक येतात.
लेपाक्षी मंदिर 16 व्या शतकात विजयनगर साम्राज्याचे शासक कृष्णदेव राय यांच्या कारकिर्दीत बांधले गेले. हे मंदिर वीरभद्र, भगवान शंकराचे एक रूप आहे. रामायण काळात माता सीतेला वाचवताना पक्षीराज जटायू या ठिकाणी पडला होता. तेव्हा जयाटूला उठण्यासाठी प्रभू रामाने 'ले पक्षी' म्हटले, त्यामुळे या मंदिराचे नाव लेपाक्षी पडले.
मंदिराच्या नावामागे "लेपाक्षी" अशी एक स्थानिक म्हण देखील आहे. ज्यामध्ये असे म्हटले जाते की एका राक्षसाने हे मंदिर गायीच्या शेपटीने पकडून ओढत या ठिकाणी आणले. त्यामुळे त्या मंदिराचे नाव लेपाक्षी ठेवण्यात आले.
लेपाक्षी मंदिराचा सर्वात आकर्षक पैलू म्हणजे त्याचे हवेतील खांब. हा एक मोठा दगडी खांब आहे, जो कोणत्याही आधाराशिवाय हवेत लटकलेला आहे. हा खांब छताला टेकलेला आहे. तर जमिनीपासून काही इंच वर आहे.
काही लोक खांबाच्या खालून पातळ कापड काढतात, तर कोणी गवताची पाती एका बाजूला सरकवून पाहतो. बरेच लोक हे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असले तरी आजपर्यंत असे कोणतेही ठोस कारण सापडले नाही ज्यामुळे या लटकलेल्या खांबाचे रहस्य उलगडू शकेल.
काहींच्या मते हा स्थापत्यकलेतील चमत्कार आहे, तर काहींच्या मते ही एक आध्यात्मिक घटना आहे. लेपाक्षी मंदिरात इतर अनेक आकर्षणे आहेत. मंदिराचा मुख्य मध्यवर्ती मंडप अत्यंत सुंदर आहे आणि त्याच्या भिंतींवर बारीक कोरीवकाम केलेले आहे.
मंदिरात भगवान शंकर, विष्णू, गणेश आणि अनेक शिल्पेही पाहायला मिळतात. मंदिर परिसरामध्ये भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या मंदिरांसह इतर अनेक मंदिरे आणि मंडप आहेत. मंदिराचा आवारही भव्य आहे. इथे गेल्यानंतर मनाला शांती मिळते. त्यामुळेच अनेक लोक दरवर्षी इथे भेट देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.