Long Weekend Travel Trip: अनेक लोकांना सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याची आवड असते. यंदा रक्षाबंधन १९ ऑगस्ट म्हणजे सोमवारला आला आहे. यामुळे शनिवार, रविवार, सोमवार अशा तिन सुट्ट्या लागून आल्या आहेत. तुम्ही या सुट्ट्यांध्ये मित्र-परिवार किंवा कुटूंबातील सदस्यांसोबत फिरायला जाण्याचे नियोजन करू शकता. पण तुमच्याकडे चारचाकी नसेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण वीकेंडचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही पुढील काही वेबसाईटवर भाड्याने कार बुक करू शकता. पण यासाठी कोणते नियम आहेत हे जाणून घेऊया.
तुम्ही वीकेंडला जाण्यासाठी 'सवारी' या वेबसाईटवर कार भाड्याने बूक करू शकता. तुम्हाला हॅचबॅक, सेडन, एसयुव्ही यासारख्या गाड्या भाड्याने बूक करता येईल. भाड्याची कार बुक करण्यासाठी तुम्ही सवारी बेवसाईट आणि अॅपचा वापर करू शकता.
मेक माय ट्रिप ही एक लोकप्रिय वेबसाइट आहे. अनेक लोक या वेबसाईटचा वापर करून बस, कार बुक करतात. तुम्ही वीकेंडला फिरायला जाण्यासाठी या वेबसाईटवर जाऊन भाड्याने कार बुक करू शकता. तुम्हाला पुणे आणि मुंबईसाठी कार भाड्याने मिळेल. या वेबसाईटवर तुम्हाला लक्झरी कार आणि उत्तम ऑफर मिळेल.
रंजीता टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही मुंबईतील स्थानिक कार भाड्याने देणारी कंपनी आहे. तुम्ही या वेबसाईटवर हॅचबॅक, सेडान आणि एसयुव्ही यासारख्या विविध प्रकारच्या कार भाड्याने बुक करू शकता. आपल्या स्पर्धेक कंपन्यांच्या तुलनेत चांगली ऑफर देतात. यामुळे तुमच्याकडे जर चारचाकी नसेल तर चिंता करू नका. या वेबसाईटवर जाऊन कार बुक करू शकता आणि वीकेंडचा आनंद लूटू शकता.
वीकेंडला फिरायला जाण्यासाठी तुमच्याकडे कार नसेल तर तुम्ही अंकित ट्रॅव्हल्स या वेबसाईटवर भाड्याने कार घेऊ शकता. ही एक मुंबईतील स्थानिक कार कंपनी आहे. यांच्याकडे आरामदायी अशा कार भाड्याने मिळतात.
ट्रॅव्हल लाइन ही मुंबईतील कार भाड्याने देणारी कंपनी आहे. या वेबसाईटवर तुम्ही लक्झरी कारसह विविध प्रकारच्या कार भाड्याने बुक करू शकता.
कार भाड्याने घेण्यासाठी किमान 18 वर्षे पुर्ण झालेले असावे. परंतु काही कंपन्यांची कमाल वयोमर्यादा 70 वर्षे असू शकते.
कार भाड्याने घेण्यासाठी तुम्हाला वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
तुम्हाला भाड्याने कार बुक करण्यासाठी पैसे किंवा डिपॉझिट ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरावे लागतील.
विमा सामान्यतः भाड्याच्या पैशांमध्ये समाविष्ट केला जातो, परंतु अतिरिक्त कव्हरेजसाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.
तुम्ही गाडी घेतली त्यावेळी गाडीत जेवढं इंधन असेल तेवढंच इंधन गाडी परत करताना असणं गरजेच आहे. किंवा तुम्हाला त्या इंधनाचे पैसे द्यावे लागतील
तुम्ही भाड्याची कार चालवण्यासाठी ड्रायव्हर घेऊ शकता. पण यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.
तुम्ही शेवटच्या क्षणी तुमचे बुकिंग रद्द केल्यास तुम्हाला रद्द करण्याचे चार्जेस द्यावे लागतील.
पण लक्षात ठेवा कारच्या प्रकारानुसार नियम बदलू शकतात. यामुळे कंपनीशी थेट संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.