Lord Shiva Temple : आशियातील सर्वात मोठं शिवलिंग कुठे आहे?

या भव्य शिवलिंगाची स्थापना कोणी केली?
Lord Shiva Temple
Lord Shiva Templeesakal
Updated on

Lord Shiva Temple : हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात महादेवांची उपसना करून शिवलिंगाला अभिषेक घालणे, उपवास करणे शुभ मानले जाते. श्रावणात शिवलिंगाच्या मंदिरात गर्दी होते. तुम्हीही यंदाच्या श्रावणात एखाद्या प्रसिद्ध शिव मंदिराला भेट देणार असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी आहे.

अधिक श्रावण संपून लवकरच खऱ्या श्रावण महिन्याला सुरूवात होत आहे. यंदाचा पवित्र महिना सावन आणखीनच खास असणार आहे, कारण या वर्षी सावन महिना अधिक आहे. यासोबतच सावन महिना ५९ दिवसांचा असेल.

श्रावण महिन्यात देशातील प्रसिद्ध शिवमंदिरांना भेटी दिल्याने तुम्हाला भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो. (This thing related to Asia's biggest Shivling will surprise you, it is at this place in UP)

Lord Shiva Temple
Worlds Tallest Shiva Statue : जगातील सर्वात उंच भगवान शंकरांची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?

आज आपण आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिवलिंगाबद्दल माहिती घेणार आहोत. जे उत्तर प्रदेशातील गोंडा येथे आहे. गोंडा येथे असलेल्या या आशियातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची खास गोष्ट म्हणजे ते 15 फूट वर दिसते आणि जमिनीपासून 64 फूट खाली आहे.

म्हणूनच ते आशियातील सर्वात मोठे शिवलिंग मानले जाते. आशियातील सर्वात मोठे शिवलिंग असण्यासोबतच हे शिवमंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. गोंडाचे हे शिवमंदिर पृथ्वीनाथ मंदिर म्हणून ओळखले जाते. (Shivling)

या शिवलिंगाची स्थापना भीमाने केली होती

गोंडा येथील पृथ्वीनाथ मंदिरातील या शिवलिंगाची स्थापना पांडवपुत्र भीम याने केली होती. द्वापार युगात पांडवांच्या वनवासात भीमाने या शिवलिंगाची स्थापना केली होती असे मानले जाते. असे मानले जाते की या शिवलिंगाच्या दर्शनानेच सर्व संकटे दूर होतात. (Lord Shiva)

या शिवलिंगाची स्थापना भीमाने केली होती
या शिवलिंगाची स्थापना भीमाने केली होतीesakal
Lord Shiva Temple
Lord Shiva : महादेवाचं अस्त्र करणार देशाचं रक्षण; भारत बनवतोय महेश्वरास्त्र!

या मंदिराची आख्यायिका

द्वापार युगात पांडव अज्ञातवासात असताना या भागात राहिले होते. येथे बकासुर नावाचा राक्षस दररोज एक बैल आणि एक माणूस खात असे. गावातील लोक यामुळे त्रासले होते. माता कुंती येथून जात असताना एका मुलीचे रडणे तिच्या कानावर पडले.

कारण विचारता कुंतीला समजले की, त्या मुलीच्या घरातील माणूस त्यादिवशीचे बकासुराचे भक्ष्य होता. कुंतीने तिला दिलासा दिला व भीमाला बकासुराचा वध करण्यास सांगितले. त्यानुसार भीमाने बकासुराला ठार केले. त्यानंतर त्याने या शिवलिंगाची स्थापना केली. (Temples in india)

Lord Shiva Temple
Offer Water To Shivling : अडचणींच्या फेऱ्या अडकलाय? जाणून घ्या, शिवलिंगावर जलभिषेक करण्याची योग्य पद्धत !
जमिनीखाली सापडले सात खंडाचे शिवलिंग
जमिनीखाली सापडले सात खंडाचे शिवलिंग esakal

शिवलिंग 7 खंडांचे आहे

हे सात खंडांचे शिवलिंग आहे जे 15 फूट वर दिसते आणि जमिनीपासून 64 फूट खाली आहे. तसेच हे मंदिर 5000 वर्षे जुने आहे. काळ लोटत होता तसे हे शिवलिंग जमिनीत रुतत गेले. पृथ्वीनाथ नावाच्या माणसाने राजा मानसिंग याच्या परवानगीने येथे घर बांधण्यासाठी जमीन खोदायला सुरूवात केली.

तेव्हा पृथ्वीनाथ सिंह यांना त्या जमिनीखाली सात भागांचे शिवलिंग गाडल्याचे स्वप्न पडले. तेव्हा तिथे खोदले असता शिवलिंग सापडले. त्यानंतर या शिवलिंगाची पूजा सुरू झाली आणि तेव्हापासून या मंदिराचे नाव पृथ्वीनाथ मंदिर झाले. (Shravan 2023)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.