मातृत्वाचं सुखं देवानं स्त्रिला दिलं आहे. मातृत्वासाठी महिलांना अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. त्यापैकी एक असते मासिक पाळी. महिलांना मासिक पाळीवेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पाळी आहे म्हणून शांत झोपून राहणं प्रत्येकीच्या वाट्याला येत नाही. तर अनेकींना प्रवासादरम्यानही पाळी येते.
महिला अनेकदा पाळीच्या काळात प्रवास करणे टाळतात. पण कधी कधी असं होत नाही आणि कधी कधी प्रवास करतानाही मासिक पाळी सुरू होते. पाळी येणं हे आपल्या हातात नसतं. पण त्यासोबत प्रवास न करता घरीच बसून राहणंही शक्य नाही. त्यामुळे पाळीत कामं, प्रवास करावा लागतो. (Travelling Tips)
जर तुम्हाला प्रवासादरम्यान पाळी आली, किंवा पाळी असताना प्रवास करावा लागणार असेल तर काय उपाय करावे ज्यामुळे तुमचा पाळीतील प्रवास सुखकर होईल हे पाहुयात.
सर्व प्रथम तुम्ही जिथे जाण्याचा प्लॅन करत आहात त्या ठिकाणचे हवामान तपासा. पाऊस, ऊन अन् थंडी अशा वेगवेगळ्या ऋतूमध्ये काळजी घ्यावी लागते. कारण, ऋतूनुसार तुमच्या शरीरात बदल होत असतात. ज्या बदलांमुळे तुम्हाला पाळीचा कमी-जास्त त्रास होऊ शकतो. अशावेळी ऋतूपाहून योग्य ती काळजी घेतली तर प्रवासादरम्यान अधिक त्रास होणार नाही.
तुम्ही प्रवासाला बाहेर पडण्याआधी पाळीच्या तारखेचा विचार करा. दोन-तीन पुढे मागे होणारी पाळीची सायकल असेल तर तुम्ही योग्य त्या गोष्टी सोबत घेऊन घरातून बाहेर पडा. तुमच्या बॅगेत आपत्कालीन किट तयार ठेवा. या किटमध्ये डिस्पोजेबल पिशव्या, नॅपकिन्स, वाइप्स, ओले वाइप्स, लहान टॉयलेट रोल ठेवा. या वस्तू तुम्हाला पाळीदरम्यान योग्य हायजिन राखण्यात मदत करू शकतील.
ओल्या वाइप्समुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि डिस्पोजेबल बॅग असल्याने, रुमाल टाकायला जागा नसेल, तर तुम्ही ती गाडीत वेगळी ठेवू शकता आणि डस्बिन सापडल्यावर त्याची विल्हेवाट लावू शकता.
या काळात प्रावसात होणाऱ्या क्रॅम्प्समुळे महिलांना खूप त्रास होतो. तसेच, प्रवास टाळता येणारा नसेल तरी कठीण परिस्थिती उद्भवू शकते. आपण आपल्यासोबत गरम पॅड किंवा उबदार बँड घेऊ शकता. ते पोटाभोवती बांधल्याने स्नायू दुखणे, ताणणे आणि ताण यापासून बऱ्यापैकी आराम मिळू शकतो.
प्रवासात पॅडपेक्षा मासिक पाळीचे कप अधिक उपयुक्त ठरतात. प्रथम, त्यांना वारंवार बदलण्याची गरज नाही. त्यांची विल्हेवाट लावण्याची कोणतीही समस्या नाही. याच्या मदतीने पुरळ आणि खाज येण्यापासूनही आराम मिळू शकतो. यामुळे सामानाची जागाही वाचते.
पीरियड अंडरवेअर आणि मेन्स्ट्रुअल कप यांचे कॉम्बिनेशन तुम्हाला प्रवासादरम्यान खूप आराम देऊ शकते. याद्वारे तुम्ही कमी सामानासह प्रवास करू शकता आणि अधिक सुरक्षितता मिळवू शकता.
कधीकधी काही महिलांना मासिक पाळीदरम्यान खूप वेदना होतात. अशा परिस्थितीत तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पेन किलर सोबत घ्या आणि तुमच्या पिशवीत काही खाद्यपदार्थही ठेवा ज्यामुळे तुमचा मूड चांगला होतो. या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही मासिक पाळीच्या काळातही तुमचा प्रवास थोडा सोपा करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.