महादेव, श्रीराम व सीतेच्या चरणांनी पावन झालेले मन्नाथेश्वर देवस्थान

महादेव, श्रीराम व सीतेच्या चरणांनी पावन झालेले मन्नाथेश्वर देवस्थान
Updated on

मेंढला (जि. नागपूर) : नागपूर ते वरूड रोडवर भारसिंगी हे गाव बसले आहे. या गावातील बसस्थानकापासून कारंजा (जि. वर्धा) येथे रस्ता जातो. या रस्त्यावर नरखेड तालुक्यातील घोगरा गावातील तीन किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर वसलेले श्री मन्नाथेश्वर देवस्थान आहे. हे मंदिर अति प्राचीन शिवमंदिर आहे. येथे असलेले शिवलिंग साक्षात असल्याचे अनेक वयोवृद्ध भाविकांकडून सांगण्यात येते. महाशिवरात्रीनिमित्त येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागत असते. दरवर्षी श्री क्षेत्र मन्नाथेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात येते.

श्री मन्नाथेश्वर देवस्थान चारही बाजूंनी निसर्गरम्य वातावरणांनी व्यापलेले आहे. तसेच उंच टेकडीवर वसलेले आहे. येथील शिवलिंग मंदिर अति प्राचीन कालीन असून, येथेच लागून सीताची न्हानी आहे. श्री क्षेत्र मन्नाथेश्वर देवस्थान येथे महादेव शंकरांनी काही काळ वास्तव केले होते. तर प्रभू श्रीराम वनवासात असताना देखील सीतेसोबत काही काळ येथे थांबले होते. येथे आज देखील असिस्तवात असलेली सीताची न्हाणी यांचे सबुत देऊन जाते. सीता माता व श्री राम येथे असताना सीता मातेला आंघोळीला असणारी सीतेची न्हाणी आज पण येथे बघायला मिळते.

महादेव, श्रीराम व सीतेच्या चरणांनी पावन झालेले मन्नाथेश्वर देवस्थान
वीस वर्षांनंतर पहिल्याच पतीशी पुनर्विवाह; पत्नीने केला होता दुसरा विवाह

ऋषी पंचमी, श्रावण महिना, महाशिवरात्रीमध्ये या तीर्थस्थळावर भाविक भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पाचही सोमवार येथे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची दुपारी जेवणाची सोय करण्यात येते. तर ऋषी पंचमी या दिवशी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. महाशिवरात्रीच्या दिवशी दोन दिवस येथे सतत कार्यक्रम सुरू असते. या दिवसांत भाविकांची गर्दी पाहावयास मिळते, हे विशेष...

‘क’ दर्जा प्राप्त

निसर्गरम्य वातावरण आणि अतिप्राचीन शिवमंदिर असलेले हे स्थळ भाविकांचे मन मोहून घेते. हे तीर्थस्थळ केंद्र सरकार दरबारी १९९६ पासून नोंद असून ‘क’ दर्जाचे आहे. राहण्याची व पिण्याच्या पाण्याची सोय येथे आहे. राहण्यासाठी भाविक-भक्तांसाठी मोठा हाॅल बांधण्यात आला आहे. तर पिण्याच्या पाण्याची टाकी सुध्दा बांधण्यात आली आहे.

महादेव, श्रीराम व सीतेच्या चरणांनी पावन झालेले मन्नाथेश्वर देवस्थान
‘तुझ्या पतीचा अपघात झाला, माझ्यासोबत लवकर चल’ अन्...

दुसऱ्या राज्यातूनही येतात भाविक

घोगरा, लोहारा, लोहारीसांवगा, खापा घुडन, जामगाव (फाटा), हिवरमठ, आरंभी, उदापूर, बानोरचंद, दावसा, थडीपवनी, अंबाडा, सायवाडा, तारा, उतारा, खलांनगोदी, दातेवाडी, उमठा, वडविहरा, सिंजर, साखरखेडा, मेंढला, रामपुरी तसेच अन्य लगतच्या गावातील नागरिकांची दर्शनासाठी गर्दी पाहावयास मिळते. नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा, वर्धा जिल्हा, मध्यप्रदेश येथील भाविक नेहमीच दर्शनासाठी येत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.