निर्सगाचा अदभूत अनुभव घ्या..आणि`हर हर महादेव`बोलत शिरवेल चला

सिरवेल महादेव मंदिर परिसरात निसर्गाचे सौंदर्य, मंदिराजवळ उंचावरुन पडणारा पाण्याचा धबधबा येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना भुरळ घालतो.
Shirvel Mahadew
Shirvel Mahadew
Updated on

जळगाव: दरवर्षी श्रावण महिना आला की जळगाव जिल्ह्यातील पर्यटक व भाविकांचे पाय वळू लागतात ते सातपुड्याच्या दिशेने. सातपुड्यातील (Satpuda) गारबर्डी धरण, पाल येथील अभयारण्य, हरीण पैदास केंद्र, मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) प्राचीन सिरवेल महादेव मंदिर (Shirvel Mahadew Tempal) ,आदी. निसर्ग रम्य ठिकाणे ही नेहमीच आकर्षणाचे केंद्र बनली आहेत.ते पाहण्यासाठी यावर्षीही गर्दी होत आहे.

Shirvel Mahadew
जळगावमध्ये आढळला दुर्मिळ भारतीय अंडीखाऊ सर्प

श्रावण महिन्यातील चारही सोमवारी सिरवेल महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविक येत असतात. हिंदू धर्मात श्रावण महिन्यात महादेवाचे दर्शनाचे महत्व आहे. सातपड्याच्या निसर्गरम्य नयनरम्य दऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातील खर्गोन जिल्ह्यात सिरवेल हे महादेवाचे मंदिर (गुंफा) आहे. हे ठिकाण सावदा येथून ६५ किलोमीटर अंतरावर आहे. खिरोदा मार्गे पुढे सातपुडा पर्वतातून प्रवास तोही घाटातून नागमोळी प्रवास चोहो बाजूने हिरवळ, सेल्फी पॉईंट, पुढे जाऊन सातपुड्याच्या कुशीत सुकी नदी त्यावर असलेले गरबर्डी धरण पाहण्यासारखे आहे. हा परिसर जणूकाही खानदेश चे माथेरान समजला जातो.

Satpuda
Satpuda

पाल पासून खडतर प्रवास..

पाल हे महाराष्ट्र सीमेवरील शेवटचे मोठे गाव येथून पुढे सुरू होतो खडतर प्रवास गारखेडा यावल अभयारण्याचा हा परिसर पाल पासून ३५ किलोमीटर मध्यप्रदेश राज्यातील प्राचीन शिरवेल महादेव मंदिर. येथे जाण्याचा प्रवास तसा खडतरच म्हणावा लागेल. जास्त करून मोटार सायकलने प्रवास करणारे अधिक असतात. मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवर वन्य जीव व्यवस्थापन समितीची चौकी असून तिथून पुढे जामन्या व सिरवेल असे दोन दगड मातीचे रस्ते आहे. या मंदिराला फार जुने अध्यात्मिक महत्त्व असून भाविकांची मोठी श्रद्धा आहे. शिरवेल महादेवाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात येथील भक्त दरवर्षी श्रावण महिन्यात मोठी गर्दी करत असतात. मागच्या वर्षी कोरोना महामारीमुळे प्रशासनाने काही निर्बंध लागू केले होते.यामुळे अनेक भाविकांचा हिरमोड झाला होता.घरातच बसून लोक कंटाळले होते.पण आता कोरोना आटोक्यात येत असल्याने लोक पर्यटनासाठी बाहेर निघत आहे.

निर्सग सौंदर्याचा अदभूत अनुभव घ्या..

भगवानपुरा येथील वनांचल आणि सातपुडा या नयनरम्य मैदानावर वसलेल्या याच प्राचीन सिरवेल महादेव मंदिर परिसरात निसर्गाचे सौंदर्य, मंदिराजवळ उंचावरुन पडणारा पाण्याचा धबधबा येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना भुरळ घालतो. श्रावण महिन्यात महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील शिवभक्त मोठ्या संख्येने गुहेतील भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी सातपुड्यात येत आहेत. शतकानुशतके जुन्या असलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे आजही भक्तांना धबधब्याजवळ उंच लोखंडी शिडी चढून नैसर्गिक गुहेत बसलेल्या भगवान भोले महादेवाचे दर्शन घेतात.

Shirvel Mahadew
Shirvel Mahadew
Shirvel Mahadew
देवाऱ्यातुन देव गायब..चोरटयांनी देवच पळविले
Shirvel Mahadew
Shirvel Mahadew

अशी आहे शिरवेलची आख्यायिया..

शिरवेलची आख्यायिका पाहता रावणाने तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले होते.रावणाने आपले दहाशिर महादेवाला अर्पण केल्याची आख्यायिका आहे. त्यावरूनच या स्थानाचे नाव सिरवेल असे पडल्याचे बोलले जाते.येथे असलेली शिवलिंग ही स्वयंभू असल्याने याठिकाणी केले जाणारे नवस हे पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.पहाडाच्या खालून अतिशय खडतर मार्गाने जाऊन साठ फूट वर असलेल्या गुंफेत स्वयंभू महादेवाचे शिवलिंग आहे.सातपुड्याचा नयनरम्य असा परिसर डोळ्यांचे पारणे फेडणारा असल्याने येथे येणारा प्रत्येक जण निसर्गात रमून जातो.मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या सिरवेल महादेवाच्या डोंगराळ भागात तुरळक पावसामुळे हा नैसर्गिक धबधबा आणखीच आकर्षक दिसत आहे.पावसाळ्यात सातपुड्याच्या डोंगर दऱ्या या हिरव्या शालूनी नटल्या आहेत.उंचावरुन कोसळणारे धबधबे,अधून मधून बरसणाऱ्या पावसाच्या धारा आणि हिरवळ भाविकांना आकर्षित करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()