महाराष्ट्रातील अद्भूत किल्ल्यांमध्ये हरिहर किल्ला आहे रंजक

Maharastra Harihar Fort News: किल्ला सह्याद्रीच्या हिरव्यागार टेकड्यांच्या माथ्यावर वसलेला आहे. त्याला पश्चिम घाट म्हणून देखील ओळखले जाते.
Harihar Fort
Harihar FortHarihar Fort
Updated on

जळगाव ः महाराष्ट्रात (Maharastra) प्रत्येक जिल्ह्याला एतिहासीक वारसा लाभलेला असून डोंगर, टेकड्यांवर अनेक किल्ले आहेत. या किल्ल्यांचा स्वतःचा समृद्ध इतिहास आहे. आता मात्र हे किल्ले पर्यटकांसाठी खास आकर्षणाचे ठिकाण बनले आहेत. यापैकी एक किल्ले म्हणजे महाराष्ट्राचा हरिहर किल्ला (Harihar Fort), जो पर्यटकांसाठी ट्रेकिंग व फिरण्याचा (Trekking for tourists) थरारक अनुभव देतो. या किल्ल्यावर प्रत्येक जण चढाई करू शकत नाही. कारण बर्‍याच ठिकाणी 90 अंशांपर्यंत चढाई करावी लागते. हा किल्ला जमिनीवर नाही तर एका सुंदर डोंगराच्या माथ्यावर आहे. चला तर जाणून घेवू या अदभूत आणि मनात धडकी भरविणाऱ्या या किल्ल्याबद्दल..

(harihar fort in maharashtra is amazing)

Harihar Fort
Harihar Fort

व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला

या किल्लाला हरिहर किल्ला किंवा हर्षगड असे म्हतले जातो. हा किल्ला सह्याद्रीच्या हिरव्यागार टेकड्यांच्या माथ्यावर वसलेला आहे. त्याला पश्चिम घाट म्हणून देखील ओळखले जाते. हा किल्ला घोटी आणि नाशिक शहर पासून 40 कि.मी. अंतरावर आहे. तर इगतपुरीपासून 48 कि.मी. अंतरावर आहे. हा महत्त्वपूर्ण गड किल्ल्याचा महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा गोंडा घाट मार्गे व्यापार मार्गाकडे लक्ष ठेवण्यासाठी करण्यासाठी बांधण्यात आला. आज हा किल्ला ट्रेकर्स साठी आकषर्णाचे केंद्र बनले आहे.

Harihar Fort
Harihar Fort

हरिहर किल्ल्याचा इतिहास

पश्चिम घाटाच्या त्र्यंबकेश्वरच्या पर्वतावर हरिहर किल्ला आहे. किल्ल्याची स्थापना सोना किंवा यादव वंशात झाला म्हणजेच 9 व्या 14 व्या शतकाच्या दरम्यान बांधला असावा. त्यावेळी गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापार मार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला खूप महत्वाचा होता. सुरुवाती झालेले हल्लेपासून तर ब्रिटिश सैन्याने ताब्यात घेईपर्यंत विविध आक्रमण या किल्याने झेलले. अहमदनगर राजघराण्यातील व्यापलेल्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता. १६३६ मध्ये, हरिहर किल्ल्यासह त्र्यंबक, त्रिंगलवाडी व इतर काही आताचे पुणे किल्ले शहाजी भोसले यांनी मोगल जनरल खान झमानच्या ताब्यात दिले. मग 1818 मध्ये त्र्यंबकच्या पंतत नंतर तो हरिहर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आला. हा 17 भक्कम किल्ल्यांपैकी एक होता जो त्यावेळी कॅप्टन ब्रिग्सने ताब्यात घेतला होता.

Harihar Fort
Harihar Fort

अशी आहे हरिहर किल्ल्याची रचना ?

हा किल्ला पर्वताच्या पायथ्यापासून चौरस दिसतो, परंतु त्याची रचना प्रिझमसारखी आहे. याची रचना दोन्ही बाजूंनी ० अंश असून किल्ल्याची तिसरी बाजू 75 अंश आहे. हा किल्ला डोंगरावर 170 मीटर उंचीवर असून एक मीटर रूंद सुमारे 117 पायऱ्याद्वारे आपण या किल्लावर जावू शकतो. चढून गेल्यानंतर महादरवाजा हा मुख्य दरवाजा आहे, जो अजूनही अतिशय चांगल्या स्थितीत आहे. जरी किल्ल्याचा बराचसा भाग ढासाळला असला तरी त्याची रचना अजूनही प्रभावी आहे. गडाच्या अर्ध्या मार्गावर जाणे अगदी सोपे आहे. डोंगराच्या पायथ्याशी अनेक पायवाटे तेथून जलाशय व काही विहिरींशी जोडतात. सैन्याच्या चौकीसाठी काही घरेसुद्धा येथे होती. आता ती अस्तित्त्वात नाही.

Harihar Fort
Harihar Fort

प्रवास आणि जेवणासाठी पर्याय

निर्गुडपाडा गावात राहण्याची सुविधा आहे परंतू हर्षवाडीत जेवण व राहण्याची सुविधा नाही. येथे रस्त्याच्या कडेला काही ढाबे आहेत, जिथे आपल्याला खाण्यापिण्याच्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. किल्ल्याच्या शिखरावर पोहोचल्यानंतर पर्यटकांना हनुमान व शिवचे छोटी मंदिरेही दिसतील. त्याच वेळी मंदिराशेजारी एक लहान तलाव देखील आहे, जिथे पाणी अगदी शुद्ध आहे. हे पाणी तुम्ही सहज पिऊ शकता. येथे राहण्यासाठी तलावापासून थोड्या अंतरावर गेल्यानंतर पर्यटकांना दोन खोल्यांचा एक छोटा राजवाडा दिसेल. सुमारे 10-12 लोक या खोलीत सहजपणे राहू शकतात. यासह बासगड किल्ला, उत्तावद पीक आणि ब्रम्हा हिल्सचे सुंदर दृष्य पाहू शकतात. तसेच येथे बर्‍याच गोष्टींचा आनंद घेऊ शकतात. डग स्कॉट (माउंटन) यांनी 1986 मध्ये या किल्ल्यावर सर्वप्रथम ट्रेकिंग केली होती. इथला ट्रेक डोंगराच्या पायथ्याशी बांधलेल्या निर्गुडपाडा गावातून सुरू होतो.

Harihar Fort
Harihar Fort

जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन

या किल्ल्यापासून जवचे आंतराराष्ट्रीय व स्थानिक विमानतफ म्हणजे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळ हे १७० किमी लांब आहे. तसेच जळवचे रेल्वे स्टेशन नाशिक ५६ किमी, तर कासारा ६० किमी अंतरावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.