जळगाव ः उन्हाळाच्या सुट्टीच्या (Summer vacation) दिवशी वाॅटर पार्क (Water Park) मध्ये सर्वांना जाण्यास नक्की आवडेल. भारतात अशी अनेक उत्तम वॉटर पार्क आहेत जिथे तुम्ही उन्हाळी सुट्टी आनंदात घालवू शकतात. वॉटर पार्क मध्ये गेमिंग, स्पोर्ट्स, पिकनिक सुविधा आणि रिसॉर्ट सुविधा देखील आहे तर चला तर जाणून घेवू या वाॅटर पार्क बद्दल...
वंडरला (बंगलोर)
दक्षिण भारतमधील बंगळुरू शहरात वंडरला वाॅटर पार्क हे उत्तम पार्क आहे. विकेंडच्या दरम्यान लाखो कुटुंबे येथे सुट्टी घालविण्यासाठी येतात. लहान मुलांसाठी येथे स्वतंत्र वॉटर पार्कही आहे. येथे वॉटर पार्कसह थीम पार्क, संगीत कारंजे आणि लेसर शो आहे. या व्यतिरिक्त उत्कृष्ट वॉटर राइड्सचा थरारक आनंद तुम्ही घेवू शकतात.
वाॅटर वर्ल्ड (मुंबई)
आशियातील सर्वात मोठे वॉटर पार्क हे मुंबईत असून त्याचे नाव वाॅटर वर्ल्ड आहे. हे भारतातील सर्वात जुने वॉटर पार्क आहे. कुटुंबासमवेत आठवड्याच्या शेवटी सुट्टी आंनदात घालविण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. या वाॅटर पार्कच्या पर्यटकांसाठी समुद्रकिनारा देखील तयार करण्यात आला आहे. येथे वॉटर राइड्स,वॉटर स्पोर्ट्स, लेगून आणि व्हॉट-ए-कोस्टर या खेळांचा आनंद घेऊ शकता.
वर्ल्ड्स ऑफ वंडर (दिल्ली)
भारताची राजधानी दिल्ली शहराजवळ नोएडा शहरात वर्ल्ड्स ऑफ वंडर हे वाॅटर पार्क आहे. हे भारतातील उत्तम वाॅटर पार्क पैकी हे एक आहे. येथे सर्व वयोगटातील लोकांसाठी उन्हाळ्याची सुट्टी घालविण्याचे चांगले ठिकाण आहे. येथे फ्री फॉल आणि टर्बो टनेल हे राईड्स आहेत. मुलांसाठी मिनी वॉटर पार्क, गडी बाद होण्याचा क्रम, वेगवान रेसर, वेव्ही पूल आदी राईडसचा आनंद घेऊ शकतात.
इमॅजिका वॉटर पार्क (मुंबई)
मुंबईत आणखी एक इमॅजिका वॉटर पार्क हे प्रसिद्ध आहे. येथे कठीण वळण, स्प्लॅशिंग इत्यादी उत्कृष्ट पाण्याच्या राईडींगसाठी प्रसिद्ध आहे. केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक येथे येतात. हे एक उच्च दर्जाचे वॉटर पार्क असून येथे उत्कृष्ट राईड्स आणि उत्तम खाण्या -पिण्याच्या सुविधा देखील येथे आहे. वॅकी वेव्ह, स्विर्ल-व्हिर्ल, पायरट बाय सारखे राईड्स आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.