Radhanagari Tourism : राधानगरी पर्यटन विकासासाठी आमदार प्रकाश आबिटकर ॲक्शन मोडवर; उचललं 'हे' आश्वासक पाऊल

अभयारण्य व धरणक्षेत्रातील ८४ गावांचा पर्यटन विकासाचा एकात्मिक पर्यटन (Radhanagari Tourism) विकास आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू व्हावी.
MLA Prakash Abitkar
MLA Prakash Abitkaresakal
Updated on
Summary

प्राधिकरणाकडून नजीकच्या काळात आवश्यक कार्यवाहीला प्रारंभ होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील. - प्रकाश आबिटकर

राधानगरी : राधानगरी अभयारण्य (Radhanagari Sanctuary) आणि राधानगरी धरणक्षेत्रातील गावांच्या पर्यटन विकासासाठी स्थापन झालेले विशेष नियोजन प्राधिकरण आता ॲक्शन मोडवर येण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी आश्वासक पाऊल उचलले आहे. या अनुषंगाने लवकरच पर्यटन मंत्री, नगर विकास विभागाचे सचिव, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आदींची आढावा बैठक होणार आहे.

आमदार आबिटकर यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निर्देशाने राधानगरी अभयारण्य आणि धरणक्षेत्रातील गावांचा ‘‘इको पर्यटन’’ क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती झाली. प्राधिकरण नियुक्तीचा अध्यादेश मे २०२३ मध्ये निघाला. मात्र, प्रत्यक्षात आठ महिन्यांनंतरही प्राधिकरणाचे कामकाज सुरू झालेले नाही. या प्रश्नाकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधल्यानंतर आमदार आबिटकर यांनी वृत्ताची दखल घेऊन विशेष लक्ष घातले.

MLA Prakash Abitkar
Valentine's Day : 'ती'च्या डोळ्यांनी 'तो' अनुभवतो प्रेमाचे रंग; 9 वर्षांच्या संसारात मयुरीची 'दीपक'ला डोळस साथ

प्राधिकरणाच्या माध्यमातून अभयारण्य व धरणक्षेत्रातील ८४ गावांचा पर्यटन विकासाचा एकात्मिक पर्यटन (Radhanagari Tourism) विकास आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरू व्हावी. तसेच, नगररचना सहायक संचालकांकडून अधिसूचनेनुसार विशेष नियोजन प्राधिकरणाची हद्द दर्शविणारे नकाशे अधिप्रमाणित करण्यासाठी शासनास सादर व्हावेत. या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक होणार आहे.

MLA Prakash Abitkar
Valentine's Day : 'फूल है गुलाब का, काँटो से क्या डरना..?' असं म्हणायचा काळ गेला; आता नवी पिढी, नवे पर्याय

पर्यटनमंत्र्यांकडून आढावा बैठकीची तारीख लवकरच निश्चित होईल. आगामी काळात पर्यटन विकासाचा सर्वसमावेशक प्रस्ताव शासनाला मंजुरीसाठी सादर व्हावा. प्राधिकरणाकडून नजीकच्या काळात आवश्यक कार्यवाहीला प्रारंभ होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील.

-प्रकाश आबिटकर, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.