Monsoon Road Trips:  पावसाळ्यात एकतरी रोड ट्रिप केलीच पाहिजे राव! इथे आहेत Best Destinations

पावसातील प्रवास करायचा तर तो बाईकवरूनच केला पाहिजे
Monsoon Road Trips
Monsoon Road Tripsesakal
Updated on

Monsoon Road Trips :  पाऊस म्हटलं की पहिल्यांदा आठवतात त्या सौमित्राच्या ओळी. ‘पहिला पाऊस पहिली आठवण. पहिलंच घरटं पहिलंच अंगण..’ या ओळी आठवतात, पण ही आठवण कित्येकदा पहिली नसतेच, पण तरीही प्रत्येक वेळी ती पहिल्यांदाच अनुभवावीशी मात्र वाटते. अशा वेळी चातकासारखी पावसाची वाट पाहणारे लोक पावसाळी ट्रिपचे नियोजन करतात.

पावसातील प्रवास करायचा तर तो बाईकवरूनच केला पाहिजे. कारण, बाईकवरून पावसाच्या सरी अंगावर झेलत पावसाचा खरा आनंद लुटता येतो. प्रवासाची आवड असलेले लोक वीकेंड किंवा दोन दिवस सुट्टी मिळाल्यावर सहलीला जाण्याचा विचार करतात. (Monsoon Road Trips: Top 5 monsoon road trips best destinations for a scenic drive)

Monsoon Road Trips
2023 long Weekend Trip: नव्या वर्षात धमाल करायला ही कमाल ठिकाणं जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

काहीवेळा तरुण किंवा ऑफिसमधील सहकारी छोट्या-छोट्या सहलीचे नियोजन करतात आणि अचानक प्रवासाला सुरुवात करतात. पहिली सहल नियोजित नसल्यामुळे ते बस किंवा कारने प्रवास करतात. रोड ट्रिपला जाणे रोमांचक आणि सोयीस्कर देखील आहे.

रोड ट्रिपमध्ये तुम्ही कधीही कुठेही जाऊ शकता. कमी अंतर आणि कमी वेळेच्या प्रवासासाठी रोड ट्रिप हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण जर तुम्ही पावसाळ्यात रोड ट्रिपला जात असाल तर काही खबरदारी घ्यावी लागेल. पावसाळ्यात बस किंवा कारने प्रवास करायचा असेल तर अशी जागा निवडावी जिथे रस्ता सुरक्षित असेल आणि पावसात प्रवास करणे सोयीचे असेल. (Road Trip)

अनेकदा पावसात ढगफुटीमुळे किंवा डोंगराळ भागात दगड सरकल्याने रस्ते बंद होतात. त्यामुळे तुम्ही प्रवासाला जात असाल तर पावसाळ्यात रोड ट्रिपला कुठे जायचे ते आधी जाणून घ्या.

Monsoon Road Trips
Kamshet Trip : आपल्या पार्टनर सोबत पॅराग्लायडिंगची मजा घ्या तीही पुण्यापासून अगदीच जवळ
दिल्लीपासून अल्मोडाला जाताना असे ढगातून जात असल्याची फिलिंग नक्की होईल
दिल्लीपासून अल्मोडाला जाताना असे ढगातून जात असल्याची फिलिंग नक्की होईलesakal

दिल्ली ते अल्मोडा

पावसाळ्यात डोंगराळ भागात जाणे धोकादायक ठरू शकते, परंतु जर तुम्हाला मार्गांची योग्य माहिती असेल आणि तुम्हाला डोंगराळ भागात जायचे असेल तर तुम्ही दिल्ली ते अल्मोडा असा प्रवास करू शकता. दिल्ली ते अल्मोडा हे अंतर 370 किमी आहे. पावसाळ्यात येथील रस्ते आणि हिरवळ नजरेसमोर येते. दिल्ली ते अल्मोडा या रोड ट्रिपमध्ये तुम्हाला वाटेत भीमताल, लॅन्सडाउन, कासारदेवी मंदिर इत्यादींना भेट देता येईल. (Delhi)

मुंबई ते गोवा

पावसाळ्यात लाँग ड्राईव्हवर जायचे असेल तर मुंबई ते गोवा असा प्रवास करता येतो. मुंबई ते गोवा हे अंतर ५९० किलोमीटर आहे. रस्ता गुळगुळीत असला तरी मुंबईहून गोव्याला रस्त्याने जाण्यासाठी 10 ते 11 तास लागू शकतात. सुंदर दृश्ये आणि अनेक फूड पॉईंट्समधून जाताना इथला प्रवास पावसात सुखकर होईल. (Mumbai)

Monsoon Road Trips
Nagpur Trip प्लान करताय, मग या ठिकाणांना नक्की भेट द्या
मुंबई ते गोवा हा प्रवास संपूच नये असं वाटतं
मुंबई ते गोवा हा प्रवास संपूच नये असं वाटतंesakal
Monsoon Road Trips
पावसाळ्यामध्ये Adventure Trip करायचीये, मग ही आहेत महाराष्ट्रातील १० बेस्ट ठिकाणं

बंगलोर ते कुर्ग

जर तुम्हाला पावसात लाँग ड्राईव्हचा आनंद घ्यायचा असेल आणि एखाद्या छान ठिकाणी प्रवास करायचा असेल तर तुम्ही बंगलोरहून कुर्ग रोड ट्रिपला जाऊ शकता. बंगलोर ते कुर्ग हे अंतर अंदाजे २६५ किलोमीटर आहे. इथला रस्ता पावसात प्रवासासाठी चांगला आणि सोयीचा आहे आणि सुंदर दृश्यांनी भरलेला आहे. (Bengaluru)

बंगलोर ते कुर्ग हा रोड सर्वात सुंदर आहे
बंगलोर ते कुर्ग हा रोड सर्वात सुंदर आहेesakal
Monsoon Road Trips
Family Trip: फॅमिली ट्रिपचा विचार करताय ? असे करा प्लॅनिंग आणि वाचवा अतिरिक्त खर्च...

दार्जिलिंग ते गंगटोक

पावसाळ्यात दार्जिलिंगला भेट देणे हा उत्तम पर्याय आहे. या सीझनमध्ये दार्जिलिंग आणि गंगटोकमध्ये फिरायला मजा येईल. म्हणूनच पावसात तुम्ही दार्जिलिंग ते गंगटोक रोड ट्रिप प्लॅन करू शकता. दोघांमधील अंतर 100 किमी आहे. NH10 वरून चार तासांचा प्रवास करून तुम्ही दार्जिलिंग ते गंगटोकपर्यंत रोड ट्रिपला जाऊ शकता. (Darjeeling)

उदयपूर ते माउंट अबू

पावसात सुरक्षित आणि मजेदार राइडसाठी, तुम्ही राजस्थानच्या सुंदर शहर उदयपूर येथून माउंट अबूला रोड ट्रिपला जाऊ शकता. उदयपूर तलावांसाठी प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये माउंटाबू हे राजस्थानचे एकमेव हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात इथला रस्ता चांगला असतो. या मार्गावर, भव्य रस्त्यांवरून पुढे गेल्यावर तुम्ही माउंट अबूला पोहोचाल. (Udaypur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.