Monsoon Tour  : मैं रहू या ना रहू! या सुंदर गाण्याचं शूट परदेशात नाहीतर इथं झालंय, लोकेशन जाणून घ्या अन् सीन करा रिक्रीएट

‘किसी रोज बारीश जो आये, समझ लेना बुंदो मे मै हू!’ या सुंदर गाण्याच्या ओळी पावसाळा अधिकच सुंदर रोमॅन्टीक बनवतात
Monsoon Tour
Monsoon Touresakal
Updated on

Monsoon Tour  :

पावसाळा आला की प्रत्येकाच्या मोबाईलवर एका गाण्याच्या ओळी सतत वाजत असतात. ‘किसी रोज बारीश जो आये, समझ लेना बुंदो मे मै हू!’ या सुंदर गाण्याच्या ओळी पावसाळा अधिकच सुंदर रोमॅन्टीक बनवतात. हे गाणंही तितकचं खास आहे कारण त्यातील लोकेशन सुद्धा आकर्षक आहे.

इम्रान हाश्मी अन् इशा गुप्ता यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं दुसऱ्या कुठल्या देशात नाही. तर,आपल्या गोव्यात शूट झालेलं आहे. हे गाणं अनेकांच्या फेवरेट लिस्टमध्ये आहे. जर तुम्हीही गोव्याला भेट देणार असाल तर गाण्यातील या लोकेशन्सवर नक्की जा.

Monsoon Tour
India squad Announced for SL Tour : तेल गेले, तूप गेले...! Hardik Pandyaची अशी अवस्था, शुभमन गिलला लॉटरी

तिथे जाऊन तुम्ही फोटोज काढू शकता, इम्रान अन् इशासारखा ड्रेस घालून तुम्ही हे गाणं रिक्रिएट करू शकता. सध्या प्रिवेडींगची क्रेझ आहे. त्यामुळे तुम्ही या गाण्याच्या लोकेशनला नक्की भेट द्या

पणजी 

या गाण्यातील काही दृश्ये गोव्यातील पणजी शहरात शूट करण्यात आली आहेत. गोव्याची राजधानी पणजी हे पर्यटनासाठी उत्तम ठिकाणांपैकी एक आहे. तुम्ही गोव्याला जात असाल तर इथे भेट द्यायला विसरू नका.

तुम्ही बॅसिलिका ऑफ बॉम जिझसला भेट देऊ शकता. हे खूप जुने चर्च आहे. या चर्चमध्ये जगभरातून लोक येतात. येथे तुम्ही कोको बीचला भेट देऊ शकता. कोको बीच पणजीपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे.

गोव्यातील आकर्षक बागा बीच
गोव्यातील आकर्षक बागा बीचesakal
Monsoon Tour
Ahmednagar Tour :पावसाळ्यात करा धबधब्यांची सफर; अहमदनगरमधील रंधा, भंडारदरा ही तर पर्यटकांची आवडती ठिकाणे

केल्विन केबल ब्रिज हा गोव्याचा एक सुंदर पूल आहे. सकाळ संध्याकाळ येथील दृश्य अतिशय सुंदर दिसते. गाण्यात इम्रान आणि ईशा जीपमधून जाताना दिसणार आहेत. हा सीन तिथे शूट करण्यात आला आहे.

गोव्यातील थंड हवेच्या झुळुकीसोबत तुम्हाला चांगले दृश्य पहायचे असेल तर तुम्ही या पुलावरून जाऊ शकता. हे गोवीतील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.

केल्विन ब्रिज, गोवा
केल्विन ब्रिज, गोवा

बागा बीच

बागा बीच हा गोव्यातील एक चांगला पर्यटन किनारा आहे. हे उत्तर गोव्यात वसलेले आहे. पर्यटकांना विश्रांतीसाठी कॉटेज आणि फिरण्यासाठी बोटीची सोयही आहे. त्यामुळे तुम्ही गोव्यात चांगला समुद्रकिनारा शोधत असाल तर तुम्ही इथे जाऊ शकता.

तुम्ही कँडोलिम बीचवरही जाऊ शकता. ते अगुडा किल्ल्यापासून सुरू होते आणि कळंगुट बीचपर्यंत जाते. हा एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे तुमचे मत आमच्यासाठी महत्वाचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.