Monsoon Tourism : एकावर एक फ्री! या ठिकाणी देवादर्शनासह घेता येईल पावसाळ्याच्या सहलीचा आनंद

आज आपण अशाच ठिकाणाबाबत जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही तुमची फॅमिली ट्रिप अगदी मनसोक्तपणे एन्जॉय करू शकू.
Monsoon Tourism
Monsoon Tourismesakal
Updated on

Monsoon Tourism : पावसाळ्याच्या सहलीचा आनंद घ्यायला कोणाला आवडणार नाही. आणि जर एकाच ठिकाणी तुम्हाला दोन वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद लुटायला मिळत असेल तर मग गोष्टच निराळी. आज आपण अशाच ठिकाणाबाबत जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही तुमची फॅमिली ट्रिप अगदी मनसोक्तपणे एन्जॉय करू शकू. चला तर जाणून घेऊया या ठिकाणाबाबत सविस्तर.

मुक्तागिरी हे महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असून ते मध्य प्रदेशात येते. जैनधर्मीयांचे हे प्रमुख तीर्थक्षेत्र असून जैनांची काशी म्हणून या स्थळाची सर्वत्र ओळख आहे. मुख्य मंदिरात सुमारे १ हजार वर्षांपूर्वीची भगवान पार्श्वनाथांची मूर्ती आहे.

विशेष म्हणजे हे मंदिर अकृत्रिम चैतालय म्हणून ओळखले जाते. याशिवाय, हिरव्यागार डोंगराच्या कुशीत इथे ५२ पांढरी शुभ्र संगमरवरी मंदिरे आहेत. धबधबा आणि गोमुखातून येणारे पाणी ही येथील वैशिष्ट्ये आहेत. हे मंदिर डोंगरावर असून तेथे जाण्यासाठी सहाशे पायऱ्या चढाव्या लागतात.

Monsoon Tourism
Monsoon Tourism

इथे जाण्याचा सर्वोत्तम काळ

रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत येथील मंदिर सुरू राहते. त्यानंतर दिवसभर बंद असते. त्यामुळे शक्यतो पर्यटकांनी रविवारी येऊ नये, आल्यास मुक्कामाची व्यवस्था आहे.

जून-जुलैमध्ये भेट दिल्यास येथील शेकडो उंचावरून पडणारा धबधबा मन प्रफुल्लित करतो. सोबतच चारही बाजूंनी असलेला हिरवागार नजारा पाहावयास मिळतो.

दरवर्षी कार्तिक महिन्यात इथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. या वेळी जैन समुदायासह इतरही हजारो भाविक या ठिकाणी येतात. (Travel & Tourism)

Monsoon Tourism
Monsoon Tourism : प्राचीन काळापासून सात देवतांचं निवासस्थान असलेलं विदर्भातलं हे ठिकाण, एकदा नक्की बघा

मध्य प्रदेशच्या भैसदेही तालुक्यांतर्गत येणारे मुक्तागिरी (मेंढागिरी) चारही बाजूने उंच पर्वतरांगांमध्ये स्थित आहे. या ठिकाणी वर्षभर जैनबांधवांसह इतर पर्यटक लाखोंच्या संख्येने येतात. नाग नदीचे पाणी, उंचावरून कोसळणारे धबधबे आणि येथील एकूण ५२ मंदिरे हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे. (Monsoon Tourism)

येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या मंदिरांबराेबरच जेवणासाठी प्रसिद्ध दाल- बाटीची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. चारशे फुटांवरून कोसळणारा धबधबा या ठिकाणी बघायला मिळतो. या ठिकाणी जैन धर्माच्या मुनींची ये-जा सुरू राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.