Monsoon Tourism : पावसाळा लागताच मान्सूनमध्ये वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्याचे प्लान्स लोक करत असतात. अगदी मुसळदार पाऊस आणि त्यात तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्या, नाले, तलाव हे सगळं डोळ्यांना गारवा देणारं असतं. नुकतीच मान्सूनला सुरुवात झाली असून तुम्हीही विकेंडला बाहेर पडण्यासाठी ठिकाणं शोधत असाल तर पुण्याजवळची ही ७ ठिकाणं तुमच्यासाठी बेस्ट ठरतील.
पुण्याजवळील मुळशी तालुक्यातील ही ठिकाणं बेस्ट
मुळशी तालुक्यात तुम्ही जाणार असाल तर लवासा, टेमघर धरण परिसर. मुळशी धरण परिसर, पिंपरी दरी पॉइंट, सहारा सिटी, काळवण परिसर, सहारा सिटी एवढी ठिकाणं तुम्हाला बघता येईल.
हवेली तालुका
पावसाळ्यात घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला धरण परिसर या भागांतील दृष्य मन मोहून घेणारे असते.
मावळ तालुका
मावळ तालुक्यात तुम्हाला फिरण्यासाठी तुम्ही विचार कराल त्यापेक्षा कितीतरी जास्त ठिकाणं इथे आहे. भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, बेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर एवढी ठिकाणं इथे फिरण्यासारखी आहेत.
आंबेगाव तालुका
या तालुक्यात डिंभे धरण, आहुपे पर्यटनस्थळ बघण्यासारखं आहे. (Pune City)
भोर तालुका
रोहडेश्वर/विचित्र गड, रायरेश्वर किल्ला, भाटघर धरण परिसर, निरादेवघर आंबवडे, भोर राजवाडा, मल्हारगड यांसारखी ठिकाणे येथे फिरण्यासारखी आहेत. (tourism)
वेल्हा तालुका
या तालुक्यात तोरणा किल्ला, राजगड किल्ला, पानशेत धरण, वरसगाव धरण यांसारखी ठिकाणं बघण्यासारखी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.