Monsoon Trekking Tips
पुणे : मॉन्सूनला सुरुवात झालीय. गडकिल्ले, डोंगर, दऱ्यांचा परिसर हिरवाईने नटत आहे. ओसंडून वाहणाऱ्या धबधब्याखाली भिजण्याचा अनेकांना मोह होईल. त्यामुळे वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी अनेकांचे वीकेंड प्लॅन तयारही असतील. वर्षाविहार जरूर करा, मात्र जीवावर बेतेल असे साहस टाळा. शिवाय वर्षाविहाराला जाताना काय करावे, काय टाळावे? याबाबत अनुभवी ट्रेकर्स काय सांगतात ते पहा...
- वर्षाविहारासाठी जाताना चार ते पाच जणांच्या ग्रुपने जावे
- ज्या ठिकाणी जायचे आहे, तेथे पहाटे लवकर पोचावे
- अनुभवी किंवा माहितगार व्यक्ती किंवा गावातील वाटाड्याला बरोबर घ्यावे
- एखाद्या ठिकाणी वाट चुकल्यास माघारी फिरावे
- जेथे जाल, तेथील माहिती कुटुंबीयांना द्यावी, तसेच आपल्याबरोबर असलेल्यांचे मोबाईल क्रमांक देऊन ठेवावा
- शासनाकडे नोंद असलेल्या ट्रेकिंग संस्थाबरोबर गेलेले कधीही चांगले
- पाणी, सुका मेवा, दाण्याचे लाडू असे कोरडे खाद्यपदार्थ बरोबर ठेवा
- लहान मुलांना नेणार असल्यास अनुभवी व्यक्तीबरोबर असावीत
हे टाळा
- शक्य असल्यास शनिवार व रविवारी जाऊ नये
- एकट्याने (सोलो ट्रिप) कधीही जाऊ नका
- धबधब्याजवळ अतिउत्साह टाळा
- धोकादायक ठिकाणी सेल्फी/फोटो काढणे टाळावे
- खोल पाण्याजवळ किंवा निसरड्या ठिकाणी जाऊ नये
- जेथे शेवाळ आहे तेथे जाणे टाळा
- किडे किंवा काटेरी वनस्पतींमुळे आखूड कपडे घालू नये
- हात-पाय पूर्ण झाकले जातील असे कपडे परिधान करावेत
- थंडीपासून बचावासाठी जर्किन किंवा विनशिटर असावे
- पाय घसरू नये म्हणून ट्रेकिंगचे बूट घालावे
प्रथमोपचार किट
- प्रथमोपचार पेटीमध्ये दोन कप्पे करा एक माहितगार व्यक्तींसाठी आणि दुसरा इतरांसाठी
- एका कप्प्यात मलमपट्टीचे साहित्य ठेवा
- दुसऱ्या कप्प्यात गोळ्या ठेवा, त्या कशाच्या आहेत, ते लिहून ठेवा
वाट चुकल्यास घाबरु नका, या ८ गोष्टी लक्षात ठेवा
- वाट चुकल्यास प्रथमत: घाबरू नका
- घाबरून सगळ्यांनाच फोन करत बसू नका
- मोबाईलची बॅटरी वाचवा, कारण रात्रभर राहण्याची वेळ आल्यास तेव्हा मोबाईल कामी येईल
- जो मदतीसाठी येणार आहे, त्यांना नीट लोकेशन शेअर करा
- पाण्याचा आणि खाण्याचा साठा व्यवस्थित आहे का ते तपासा
- पिण्याचे पाणी पुरेसे नसल्यास जवळपास कुठे मिळते का पाहा
- स्वत:हून शोधाशोध करण्याचा प्रयत्न करू नका
- कारण शोधण्याच्या नादात भलत्याच ठिकाणी पोचण्याची शक्यता असते
ही ठिकाणे टाळावीत
- देवकुंड धबधबा (पर्यटकांसाठी बंद आहे), ढाक बहिरी, कातळधार धबधबा, अंधारबन ट्रेक
"वर्षाविहारासाठी जाताना अचाट साहस टाळा. ज्या ठिकाणी जाल, तेथील सर्व माहिती घ्या. अनुभवी लोकांना बरोबर घ्या."
- सतीश मराठे, संचालक, गिरिदर्शन ट्रेकिंग क्लब
"पर्यटक धबधब्याखाली बसतात आणि वरून दगड सरकत असतात, अशावेळी गंभीर इजा होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात ढाक बहिरीचा ट्रेक करू नये. "
- सुनील गायकवाड, सचिव, शिवदुर्ग मित्र लोणावळा
"जी उन्हाळी ट्रेकची ठिकाणे आहेत, तेथे शक्यतो पावसात जाऊ नये किंवा स्थानिक मार्गदर्शकाला घेऊन जावे."
- नीलेश गराडे, संस्थापक-अध्यक्ष, वन्यजीवरक्षक संस्था मावळ
- जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष टोल फ्री क्र. १०७७
- शिवदुर्ग मित्र लोणावळा : ९८२२५००८८४
- वन्यजीवरक्षक संस्था मावळ ः ९८२२५५५००४
गतवर्षी केलेले बचावकार्य
- शिवदुर्ग मित्र लोणावळा : ६७
- वन्यजीवरक्षक संस्था मावळ ः १५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.