चहूबाजूंनी हिरवाईने नटलेला निमराना किल्ला वर्षभर पर्यटकांना आकर्षित करतो. जाणून घ्या या किल्ल्याशी संबंधित काही गोष्टी...
निमराना किल्ल्याचे (Nimrana fort) नाव तुम्ही ऐकलंय का? ऐकलं असेलच. निमराना हे दिल्लीजवळील (Delhi) वीकेंडच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. चहूबाजूंनी हिरवाईने नटलेला निमराना किल्ला वर्षभर पर्यटकांना आकर्षित करतो. जाणून घ्या या किल्ल्याशी संबंधित काही गोष्टी...
निमराना किल्ल्याचा इतिहास
निमराना किल्ला हे अलवर जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. तथापि, अलवर जिल्ह्यात निमराना नावाचे एक शहर देखील आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला या किल्ल्यात दिल्लीकरांचा जणू मेळावाच भरलेला दिसून येईल. प्रेक्षणीय, रोमॅंटिक आणि विहंगम दृश्यांनी वेढलेला हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. सहलीसाठी निमराना हे सर्वोत्तम ठिकाण आहे. हा सुंदर किल्ला 15 व्या शतकात 1464 मध्ये राजा निमोला मेउ यांनी बांधला. येथे तुम्ही शाही अनुभव घेऊ शकता.
किल्ल्याची रचना
या 10 मजली किल्ल्यात अनेक खोल्या आहेत. किल्ला लाल दगडांनी बनवला आहे. तसेच या किल्ल्याची रचनाही अतिशय सुंदर आहे. जर तुम्हाला इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही हा किल्ला पाहू शकता. या किल्ल्याची बांधणी खूपच मजबूत आहे.
निमराना किल्ल्याविषयी ठळक...
दिल्ली-जयपूरच्या मार्गावर येणारा निमराना किल्ला राजधानीपासून 122 किलोमीटर अंतरावर आहे.
तुम्ही येथे झिप लाइनिंगचा आनंद घेऊ शकता.
तुम्ही येथे स्पा थेरपी आणि स्वीमिंगचाही आनंद घेऊ शकता.
कधी भेट देऊ शकता अन् कसे पोचाल?
जर तुम्हाला हा किल्ला फिरायचा असेल तर तुम्ही आताच जाऊ शकता. कारण, ऑक्टोबर ते मार्च हा येथे भेट देण्याचा उत्तम हंगाम आहे. यावेळी येथील हवामान खूप छान असते. तसेच किल्ला पाहण्याची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 आहे. तुम्ही ट्रेनने किंवा रोड ट्रिपने येथे पोचू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.