Kanyakumari Tourism: मोदींप्रमाणे द्या कन्याकुमारीला खास भेट.. स्वर्गाहून सुंदर असलेल्या 'या' ठिकाणी घेता येईल सुट्ट्यांचा आनंद

PM Modi in Kanyakumari: पंतप्रधान मोदी तमिळनाडूमधील कन्याकुमारी येथे दाखल झाले असून विवेकानंद शिलास्मारकावर ध्यानमुद्रेत बसले आहे. तुम्हीही सुट्ट्यांमध्ये कन्याकुमारीला जाण्याचा विचार करत असाल तर तेथील सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता.
modi kanyakumari tourism
modi kanyakumari tourismesakal

Travel Tips: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी सायंकाळी तमिळनाडूला पोहोचले. तिथल्या कन्याकुमारी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये त्यांच ध्यान सुरू झालं आहे. यापूर्वी पंतप्रधानांनी भगवती अम्मन मंदिरात जावून पूजाअर्जा केली.

कन्याकुमारी हे तामिळनाडूमधील सर्वात शांत आणि सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथील समुद्र किनारा, संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य आणि आधुनिकीकरण यांचे अद्भुत मिश्रण आहे. तुम्हीही सुट्ट्यांमध्ये कन्याकुमारीला फिरायला जाण्याचा विचार करत असाल पुढील ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका.

कन्याकुमारी मंदिर

कन्याकुमारी मंदिराला भेट देऊ शकता. हे मंदिर भगवती अम्मम मंदिर म्हणूनही ओळखले जाते. येथील शांत वातावरण आणि समृद्ध इतिहास पर्यटकांना आकर्षित करतो. असे मानले जाते की हे मंदिर पांडवांनी बांधले होते. हे मंदिर 108 शक्तीपीठांपैकी एक आहे.

पद्मानाभरुपम महाल

या महालाचे वैशिष्ट्य म्हणजे हा आशिया खंडातील सर्वात मोठा लाकडी महाल म्हणून प्रसिद्ध आहे. येथे एक जुना ग्रॅनाईट किल्ला देखील आहे. हा राजवाडा प्राचीन काळी त्रावणकोरच्या शासकांचे निवासस्थान होते. तुम्ही येथे अनेक गोष्टी पाहू शकता.

अव्हर लेडी ऑफ रॅनसम चर्च

मदर मेरीला समर्पित हे चर्च कन्याकुमारी बीचजवळ आहे. या चर्चच्या भिंती आणि छतावर गॉथिक वास्तुकलेचे सुंदर असे कोरीवकाम पाहायला मिळते. तुम्ही कन्याकुमारीला जाण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या.

modi kanyakumari tourism
काय आहे स्वामी विवेकानंदांची ध्यानपद्धती ? PM मोदी कन्याकुमारीमधील मेडिटेशनमुळे आहे चर्चेत

रॉक मेमोरियल

कन्याकुमारीमधील एका छोट्या बेटावर वसलेले विवेकानंद रॉक मेमोरियल हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. स्वामी विवेकानंदांना येथे 1892 मध्ये तीन दिवसांच्या ध्यानानंतर ज्ञान प्राप्त झाले. कन्याकुमारी देवीने या खडकावर कठोर तपश्चर्या केली होती, असेही मानले जाते.

प्रसिद्ध तमिळ कवी यांचा पुतळा

हा १३३ फूट उंच पुतळा प्रसिद्ध तमिळ कवी आणि तत्त्वज्ञ तिरुवल्लुवर यांचा आहे. या कवीने तमिळ भाषेतील थिरुक्कुरल एक प्राचीन ग्रंथ लिहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com