Places To Visit In Nashik: आपल्या आईसोबत नक्की भेट द्या नाशिकच्या या पर्यटन स्थळांना...

नाशिक हे गोदावरी नदीच्या कुशीत वसलेलं एक तिर्थक्षेत्रदेखील आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध मंदिरे नाशिकमध्ये आहेत
Places To Visit In Nashik
Places To Visit In Nashikesakal
Updated on

Places To Visit In Nashik: नाशिक (Nashik) हे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. नाशिकला महाराष्ट्रातले निसर्गरम्य पर्यटन स्थळ (Nashik Tourist Places In Marathi) म्हणणे काही चुकीचे नाही. नाशिकची अजून एक जगात भारी गोष्ट म्हणजे तिथले द्राक्षं. ज्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकला उत्तम दर्जाच्या दाक्षं आणि वाईनसाठी ओळखलं जातं. 

नाशिक हे गोदावरी नदीच्या कुशीत वसलेलं एक तिर्थक्षेत्रदेखील आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध मंदिरे नाशिकमध्ये आहेत. ज्यामुळे नाशिकला पर्यटक आणि भाविकांची नेहमीच वर्दळ असते. नाशिकमधील गोदावरीचा घाट, त्र्यंबकेश्वर, पंचवटीचा घाट आणि द्राक्षांच्या बागा पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यंटक येत असतात.

जर तुम्हीही विकेंडसाठी (travel plan) आपल्या घरच्यांसोबत कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर नाशिक यासाठी परफेक्ट आहे. इथल्या या जागा तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना खूप आवडतील.

त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple)

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक आहे. त्र्यंबकेश्वर हे शहर नाशिकमधील ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी आणि गोदावरीच्या काठावर वसलेलं आहे. दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी व भीमा नद्यांच्या उगमस्थळी बारा शिवमंदिरे बांधली. त्र्यंबकेश्वर मंदिर हे त्यापैकीच एक शिवालय आहे. पुढे नानासाहेब पेशवे यांनी हेमांडपती स्थापत्यशैलीत या मंदिराची पुर्नबांधणी केली होती. या मंदिराच्या चारी बाजुंना कोट बांधलेला असून पूर्वेकडे मुख्य दरवाजा आहे. मंदिरावर अतिशय सुंदर कोरिवकाम करण्यात आलेलं आहे.

Places To Visit In Nashik
Goa Tour Plan: गोव्यात या गोष्टी फुकटात असताना तूम्ही परदेशात कशाला जाताय?

रामकुंड (Ramkund)

रामकुंड हे ठिकाण नाशिकमधील गोदावरीच्या पात्रात बांधण्यात आलेलं आहे. असं म्हणतात वनवासात असताना प्रभू रामचंद्र या ठिकाणी स्नान करत होते. ज्यामुळे रामकुंडाला पवित्र स्थळ मानलं जातं. पेशवेकालिन कालखंडात या कुंडाची पुर्नबांधणी करण्यात आली.

Places To Visit In Nashik
Goa Trip : आता गोवा ट्रिपवर खर्च नाही कमाई होईल... कशी? या आहेत टिप्स

सप्तश्रुंगी गड (Saptashrungi)

नाशिक जिल्हात वणी येथे सप्तश्रृंगी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. पौराणिक कथांमध्ये 108 शक्तिपीठांचा उल्लेख आहे. त्यातील साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रात आहेत. त्यापैकीच एक सप्तश्रृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे. नांदुरी गावाजवळील वणी गडावर वसलेली ही देवी अनेक घराण्यांची कुलदैवता आहे. 

Places To Visit In Nashik
Travel Story : हनिमूनसाठी भारतातील स्वस्तात मस्त ठिकाणे

पंचवटी (Panchvati)

नाशिमध्ये अनेक धार्मिक स्थळे आहेत. ज्यामुळे नाशिकमधील या भागाला पश्चिम भारताची काशी असं म्हणतात. नाशिक शहरात पंचवटी हे गोदावरीच्या डाव्या तीरावर वसलेलं एक ठिकाण आहे. नाशिकमध्ये प्रसिद्ध काळाराम मंदिर आहे. या मंदिराजवळ पाच वडाच्या झाडांपासून तयार झालेल्या या ठिकाणाला पंचवटी असं म्हणतात.

Places To Visit In Nashik
Travel Diaries : आहाहा! काय नजारा... आयुष्यात एकदा तरी हा उलटा धबधबा बघा, सहलीची मज्जा होईल डबल

काळाराम मंदीर (Kalaram Temple)

नाशिकमध्ये काळाराम मंदीर प्रसिद्ध आहे. भगवान रामचंद्र वनवासात असताना या ठिकाणी वास्तव्यास होते अशी आख्यायिका आहे. पुर्वी लाकडी बांधकाम असलेले मंदीर 1782 साली सरदार रंगराव ओढेकर यांनी पुन्हा काळ्या दगडात बांधले. ज्यासाठी बारा वर्षे दोन हजार कारागिर काम करत होते असं म्हटलं जातं.

पश्चिम महाराष्ट्रातील रामाच्या अनेक सुंदर मंदीरांपैकी हे एक मंदीर आहे. या मंदिराची रचना आणि कोरीवकाम पाहण्यासारखे असून त्यात प्रभू रामचंद्र, सीता माता, लक्ष्मण यांच्या काळा पाषाणातील मुर्ती आहेत. यातील रामाची मुर्ती काळ्या पाषाणातील असल्यामुळे या मंदिला काळाराम मंदीर असं म्हटलं जातं. या तीनही मुर्ती स्वयंभू असून त्या गोदावरीच्या पात्रात जिथे सापडल्या तिथे रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड अशी नावे पडली. चैत्र महिन्यामध्ये या मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

Places To Visit In Nashik
Travel Story : देशात राहून मिळवा परदेशासारख्या दृश्यांचा आनंद

पांडवलेणी (Pandavleni Caves)

नाशिकमधील पांडवलेणीदेखील पाहण्यासारखी आहेत. या लेण्यांना बौद्धलेणी, त्रिरश्मी लेणी असंही म्हणतात. एका मोठ्या टेकडीवर ही प्राचीन लेणी असून ती जवळजवळ दोन हजार वर्षे जुनी असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पाली भाषेतील एक शिलालेख सापडतो ज्यावरून ही लेणी दोन हजार पूर्वीची असल्याचा दाखला मिळतो. या लेण्यामध्ये मुख्य चोविस लेणी असून त्यामध्ये बुद्धस्तूप, भिक्षूंची निवासस्थाने अनेक देवदेवतांच्या मुर्ती आढळतात.

सातवाहन आणि क्षत्रप राजवंशाने ही लेणी कोरण्यास मदत केल्याचा उल्लेख या ठिकाणी आढळतो. ज्यावरून नाशिकवर पूर्वी सातवाहन राजाचे अधिराज्य असल्याचा पूरावा मिळतो. यातील काही मुर्ती आता खंडीत स्वरूपात शिल्लक असल्या तरी त्यातून शिल्पकलेचं अप्रतिम दर्शन तुम्हाला मिळू शकतं. पांडवलेणी पाहण्यासाठी काही प्रमाणात फी आकारली जाते. ही लेणी पाहण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असून तिथपर्यंत पोहचण्यासाठी अर्धा तास चालत जावे लागते. नाशिकरोडवरून बौद्धलेणी पाहण्यासाठी बसेस मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.