हिरवीगार भातशेती, मंद वाहणारा वारा, डोंगरमाथ्यावर घोंघावत असलेल्या पवनचक्क्या, हे सारं सृष्टीचं सौंदर्य पाहून पर्यटक सुखावत आहेत.
Tourism News : शिराळा तालुक्यातील (Shirala) पश्चिम भागात निसर्गाने कात टाकली असून, सह्याद्रीच्या रांगांमधून हिरवाईने शाल पांघरल्याने निसर्गाची मुक्तपणे उधळण सुरू आहे. चांदोली धरण (Chandoli Dam) परिसरात एकदिवसीय पर्यटनाला पर्यटक (Tourists) गर्दी करू लागले आहेत.
सध्या या भागात श्रावणसरी बरसत असून पावसाळी पर्यटनाला उधाण आले आहे. श्रावणात हा निसर्ग नजराणा अधिकच खुलून दिसत आहे. विविध ठिकाणचे पांढरेशुभ्र धबधबे केंद्रबिंदू ठरत असून चांदोली धरण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, मिनी महाबळेश्वर असलेल्या गुढे पाचगणी पठारावरील निसर्गाचा अनमोल ठेवा भुरळ घालत आहे.
पावसाळा सुरू झाला, की हिरवाईने नटलेल्या डोंगररांगांतून फेसाळत वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे, सभोवतालची गर्द हिरवी झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट पर्यटकांना आकर्षित करत आहे. पावसाळी पर्यटनासाठी निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या व ग्रामीण भागातील निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटक या भागात भटकंती करताना दिसत आहे.
गुढे पाचगणी पठारावरून दिसणारा निसर्ग अप्रतिम भासत आहे. पावसाचा जोर काहीसा कमी असल्याने हिरवाईने डोंगररांग नटून बसली आहे. हिरवळरुपी शालीला रंगीबेरंगी, विविध जातीची रानफुले व गवतफुलांची झालर लागली आहे.
हिरवीगार भातशेती, मंद वाहणारा वारा, डोंगरमाथ्यावर घोंघावत असलेल्या पवनचक्क्या, हे सारं सृष्टीचं सौंदर्य पाहून पर्यटक सुखावत आहेत. रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे परिसरातील हिरवीगार वनराई बहरली असून, डोंगररांगामधून पसरलेले विस्तीर्ण पठार, हिरव्यागर्द डोंगर-कपारीतून छोटे मोठे धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत.
श्रावणातील वातावरणामुळे परिसर भुरळ घालत असून नजर फिरेल तिकडे हिरवाईने नटलेले विलोभनीय दृश्य पाहताना या परिसरातील हिरव्यागार सृष्टीचं सौंदर्य आणखीच खुलून दिसत आहे. गुढे पाचगणी पठारावर जाताना रांजणवाडी, सावंतवाडी, भाष्टेवाडी, येसलेवाडी येथील घाटातून प्रवास करताना असलेली नागमोडी वळणे व या घाटाचे निसर्गसंपन्न वैभव, हिरवीगार दृश्यं भुरळ पाडत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.