Navratri Travel : भारतात आहे दुर्गामातेचे शापित मंदिर; ओस पडलेल्या मंदिरात जायला घाबरतात भक्त!

राजकुमारीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर सेनापतीनेही मंदिराच्या आवारात आत्महत्या केली.
Navratri Travel
Navratri Travel Esakal
Updated on

देवाचे स्थान असलेले कोणतेही ठिकाण पवित्र मानले जाते. जिथे देव असतात तिथे कोणत्या वाईट शक्ती येत नाहीत अशी भावना प्रत्येक भक्ताची असते. सध्या नवरात्री सुरू असून देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी होत आहे. देवीच्या पेटत्या दिव्यात आपल्याकडून योगदान म्हणून तेल अर्पण केले जात आहे.असे चित्र असताना मध्यप्रेशमध्ये दुर्गामातेचे मंदिर ओस पडले आहे. तिकडे चुकूनही कोणी माणूस फिरकत नाही. काय आहे यामागील कारण पाहुयात.

Navratri Travel
Navratri Recipe: केळीचा रायता कसा तयार करायचा ?

मध्यप्रदेशच्या देवासामध्ये असलेले हे मंदिर शापित असल्याचा लोकांचा समज आहे. त्यामुळे सूर्यास्तानंतर येथे कोणी जात नाही. सूर्यास्तानंतर येथे जे कोणी गेले त्यांच्यासोबत वाईट घटना घडल्या आहेत.अशी समजूत आहे. या मंदिरातून भीतीदायक आवाज येतात. कधी सिंहांची गर्जना ऐकू येते. तर, कधी घंटांचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे सूर्यास्तानंतर या मंदिराकडे जाण्यासही लोक घाबरतात.

Navratri Travel
Eknath Shinde Navratri Darshan : मध्यरात्री २ वाजता जेव्हा मुख्यमंत्र्यांनी हाती माईक घेतला

देवासातील रहिवासी सांगतात की, या मंदिरात चुकीचा हेतू ठेवणाऱ्या व्यक्तीचे नुकसान होते. अनेकांनी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यामध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत. येथे काम करणाऱ्या कामगारांना देवीच्या तून आग निघताना दिसली, त्यानंतर काम थांबवण्यात आले. आता या मंदिरात कोणी येत नाही. 

Navratri Travel
Navratri 2022: लोणारच्या कमळजा देवी मंदिराचा काय आहे इतिहास?

पौराणिक कथा काय सांगतात...

या मंदिराशी जोडलेल्या अनेक कथा प्रचलित आहेत. देवासच्या या मंदिराशी अनेक कथा जोडलेल्या आहेत. देवासच्या राजांनी हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. मात्र त्याचे बांधकाम झाल्यानंतर राजघराण्यात अशुभ घटना घडू लागल्या. वाद, कलह होऊ लागले. त्यांच्या राजकन्येचे म्हणजेच राजाच्या मुलीचे सेनापतीसोबत प्रेमसंबंध होते. राजाला हे आवडले नाही. त्यांनी या नात्याला विरोध करत मुलीला तुरुंगात टाकले. हे अंतर सहन न झाल्याने मुलीचा तुरुंगातच गूढ मृत्यू झाला, असे मंदिराच्या आजूबाजूला राहणारे लोक सांगतात. 

Navratri Travel
Navratri 2022: गरबा कार्यक्रमात घुसलेल्या तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

राजकुमारीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर सेनापतीनेही मंदिराच्या आवारात आत्महत्या केली. यानंतर पुजाऱ्यांनी राजाला मंदिर अपवित्र झाले असून मूर्ती येथून हटवून दुसरीकडे प्रस्थापित करण्याचा सल्ला दिला.पुजाऱ्यांचा सल्ला ऐकूण राजाने दुर्गा देवीची दुसरी मुर्ती त्याजागी बसवली. भक्त देवीच्या या मंदिरात जाण्यासही घाबरतात.पण, ज्यांचा आईवर विश्वास आहे, ते प्रत्येक नवरात्रीला येथे दर्शनासाठी पोहोचतात. मात्र बाहेरून दर्शन घेऊन परततात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()