Taking Loans : प्रत्येकाला वाटतं आपण आरामदायी जीवन जगलं पाहिजे. मग यासाठी काहीजण कर्ज घेतात. ही कर्ज क्रेडिट कार्डच्या माध्यमातून असतील तर काही कर्ज बँकांच्या माध्यमातून असतील. मग लोक कशासाठी कर्ज घेतात, तर काही जण वाहनांसाठी कर्ज घेतात तर काही लोक घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी गृहकर्ज घेतात.
पण एका सर्वेक्षणातून असं दिसून आलंय की, वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत, बँकांकडून वैयक्तिक कर्ज घेतलेल्या प्रत्येक 5 व्या व्यक्तीने प्रवास, पर्यटनासाठी किंवा सुट्टी घालवण्यासाठी कर्ज घेतलं आहे. कॅलेंडर वर्षाच्या दुसर्या तिमाहीत पहिल्या तिमाहीच्या तुलनेत असं कर्ज घेणार्या लोकांची संख्या जास्त असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे या सर्वेक्षणावर आणखी आश्चर्य व्यक्त होत आहे.
या सर्वेक्षणाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिला प्रश्न होता की तो काळ जेव्हा कर्जाचा व्याजदर उच्चांकावर गेला होता आणि महागाई 6 टक्क्यांच्या आसपास होती. यावेळी महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्जाच्या मागणीवर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज होती. तरीही बँकांनी लोकांना सुट्टी घालवण्यासाठी वैयक्तिक कर्ज वाटप केलं. आज सर्वेक्षणाची ती पाने उलटू या आणि समजून घेऊया की किती लोकांनी कर्ज घेऊन देश आणि जगाचा प्रवास केला.
24 टक्के लोकांनी दुसऱ्या तिमाहीत सुट्टीसाठी कर्ज घेतलं
ऑनलाइन कर्ज प्लॅटफॉर्म पैसाबझारच्या सर्वेक्षणानुसार, जानेवारी ते जून 2023 दरम्यान कर्ज घेतलेल्या पाचपैकी एकाने वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी प्रवासाचा कारण दिलं आहे. वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांपेक्षा 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढल्याच दिसतं. ऑनलाइन कर्ज प्लॅटफॉर्म पैसाबझारने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 16 टक्के कर्जदारांनी जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान सुट्टीसाठी कर्ज घेतल.
कोणी कोणी कशासाठी कर्ज घेतलं
सर्वेक्षण केलेल्यांपैकी 21 टक्के लोकांनी जगभ्रमंती करण्यासाठी कर्ज घेतल्याचे सांगितले. तर 31 टक्के लोकांनी घराच्या नूतनीकरणासाठी पैसे घेतल्याचे सांगितले. 10 टक्के लोकांनी क्रेडिट कार्डची थकबाकी भरण्यासाठी कर्ज घेतले. त्याच वेळी, वैद्यकीय बिलाच्या 9 टक्के भरण्यासाठी कर्ज घेण्यात आले. उर्वरित 29 टक्के विवाह, शिक्षण किंवा व्यवसाय खर्च भागवण्यासाठी कर्ज घेतले.
पगारदार वर्गात सर्वाधिक क्रेझ
वैयक्तिक कर्जाबद्दल बोलायचे झाल्यास, गृहनिर्माण आणि मालमत्तेसाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यानंतर वाहन आणि शैक्षणिक कर्ज होते. पगारदार लोकांमध्ये सुट्टीतील कर्ज खूप लोकप्रिय झाली आहेत. एकूण कर्जदारांपैकी 74 टक्के पगारदार वर्गातील होते, त्यानंतर स्वयंरोजगार व्यावसायिक 14 टक्के आणि व्यावसायिक 12 टक्के होते.
लोक दुबई, हिमाचलला गेले
व्हेकेशन लोन घेतल्यानंतर लोक दुबई, थायलंड आणि युरोप सारख्या परदेशात गेले. तर देशातील लोक गोवा, हिमाचल आणि उत्तराखंड सारख्या ठिकाणी गेले. सर्वेक्षणात असे आढळून आले की, जानेवारी आणि जूनमध्ये देशाच्या बहुतांश भागांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांच्या सुट्ट्यांमध्ये कर्जाची सर्वाधिक मागणी होती. पैसेबाजारचे सह-संस्थापक आणि सीईओ नवीन कुकरेजा यांनी एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले की, गेल्या काही वर्षांत आम्ही लोकांना प्रवास आणि सुट्टीसह विविध गरजांसाठी कर्ज घेताना पाहिल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.