Winter Travel Tips
Winter Travel Tipsesakal

Winter Travel Tips : न्यू इयर सेलिब्रेशनसाठी हिलस्टेशनला जाताय? मग, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

आपण सर्वजण आता २०२३ च्या अखेरच्या टप्प्यात आहोत. अवघ्या २ दिवसांनी आपण सर्वजण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि नव्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक जण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.
Published on

Winter Travel Tips : आपण सर्वजण आता २०२३ च्या अखेरच्या टप्प्यात आहोत. अवघ्या २ दिवसांनी आपण सर्वजण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आणि नव्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक जण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.

खास करून हिवाळ्यात अनेक जण हिलस्टेशनला फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. जानेवारी महिन्यात हिलस्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात थंडी असते. या थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही बॅगपॅकिंग व्यवस्थित करणे गरजेचे आहे. या हिलस्टेशन्सला जाण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. कोणत्या आहेत या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

Winter Travel Tips
New Year 2024 : गोव्यातील ‘या’ सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर साजरा करा नवीन वर्षाचा आनंद

सर्वात आधी परफेक्ट ठिकाण फिक्स करा

न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी तुम्ही हिलस्टेशनला जाण्यापूर्वी सर्वात आधी परफेक्ट ठिकाण फिक्स करा. कारण, अनेकदा जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये एवढी थंडी पडते की, तिथे गेल्यावर माणसाचा अगदी बर्फ होतो.

त्यामुळे, सर्वात आधी परफेक्ट जागा फिक्स करा. त्या वातावरणात त्या परिसरात तुम्ही सेफ असाल आणि ट्रीप एंजॉय करू शकाल, याची काळजी घेऊनच हिलस्टेशनची निवड करा. जेणेकरून त्या प्रमाणे तुम्हाला बॅग पॅकिंग करता येईल आणि आवश्यक गोष्टी सोबत ठेवता येतील.

ओव्हरकोट जॅकेट सोबत ठेवायला विसरू नका

हिवाळ्यात हिलस्टेशनला जाण्यापूर्वी तुम्ही बॅग पॅकिंग करताना मफ्लर, जॅकेट्स, स्वेटर्स, शॉल्स इत्यादी गोष्टी सोबत घ्या. मात्र, त्यासोबतच ओव्हरकोट जॅकेटचे आवर्जून पॅकिंग करा. तुमच्याकडे ते नसेल तर अवश्य खरेदी करा.

हिवाळ्यात हिलस्टेशनला भरपूर थंडी असते. या थंडीपासून बचाव करण्याचे काम ओव्हरकोट करते. त्यामुळे, या ओव्हरकोटचे पॅकिंग करायला विसरू नका.

येण्या-जाण्याचे तिकीट सर्वात आधी बुक करा

हिवाळ्यात हिल स्टेशनला जाण्याचा तुम्ही प्लॅन केल्यानंतर येण्या-जाण्याचे तिकीट सर्वात आधी बुक करा. आगाऊ बुकिंग केल्याने तुम्हाला कोणतेही टेंन्शन राहत नाही आणि तुमचा प्रवास हा सुरक्षित होण्यास मदत होते.

अनेक जण जाण्या-येण्याचे तिकीट २-३ दिवस आधी बुक करण्याचा प्रयत्न करतात. मग, घाईगडबडीत ते बुक होत नाही आणि मग ऐनवेळी प्लॅन कॅन्सल देखील करावा लागतो. त्यामुळे, येण्या-जाण्याचे आगाऊ तिकीट सर्वात आधी बुक करा.

Winter Travel Tips
2024 long weekend : नवीन वर्षात असणार भरगच्च लाँग विकेंड्स, आतापासूनच करा फिरायला जाण्याचे प्लॅनिंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.