Nita Ambani : नीता अंबानींनी भेट दिलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा असा आहे इतिहास, महाराणी अहिल्याबाई यांच्याशी आहे थेट कनेक्शन

नीता अंबानी यांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची पहिली पत्रिका महादेवाच्या चरणी अर्पण केली.
nita ambani visit kashi vishwanath temple history
nita ambani visit kashi vishwanath temple history
Updated on

Nita Ambani :

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा, नीता अंबानी नेहमीच नेहमीच चर्चेत असतात. नुकतचं त्यांनी वाराणसीला भेट दिली. यावेळी त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली, महादेवाचे आशीर्वाद घेतले. तसेच, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची पहिली आमंत्रण पत्रिका महादेवाच्या चरणी अर्पण केली. त्यानंतर नीता अंबानी गंगा आरतीलाही उपस्थित राहिल्या.

अंबानी यांनी भेट दिलेल्या काशी विश्वनाथ मंदिराला विशेष महत्त्व आहे. काशी विश्वनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असं पुरातन मंदिर आहे. काशी विश्वनाथ मंदिराचा महिमा सातासमुद्रापार पसरला आहे. त्यामुळे या मंदिरात विदेशी पर्यटकही मोठ्या उत्साहाने येत असतात. त्यामुळं आज आपण या मंदिराविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.

काशी विश्वनाथ मंदिराला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, काशी हे सर्वोत्तम शहर आहे, जे भगवान शंकराच्या त्रिशूळावर विराजमान आहे. काशी विश्वनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी नववं ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराबद्दल असं सांगितलं जातं की, हे मंदिर स्वयं प्रकट झालं आहे. या मंदिराची कोणीही निर्मिती केलेली नाही.

nita ambani visit kashi vishwanath temple history
Monsoon Tourism: लोणावळा,खंडाळा, पाचगणी की कळसूबाई; पावसाळ्यात कुठं कुठं जायचं फिरायला?

या मंदिराला 3,500 वर्षांचा लिखित इतिहास आहे. हे मंदिर कधी बांधले गेले हे माहित नाही, परंतु त्याचा इतिहास दर्शवितो की यावर अनेक वेळा हल्ला झाला परंतु ते देखील तितक्या वेळा बांधले गेले. काशी विश्वनाथ मंदिर महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी १७८० मध्ये पुन्हा बांधले होते. नंतर महाराजा रणजित सिंह यांनी 1853 मध्ये 1000 किलो सोने दान केले.

काशी विश्वनाथ मंदिर हिंदू मंदिरांमध्ये सर्वात प्राचीन आहे. मंदिराच्या शिखरावर सुवर्ण लेप असल्यामुळे त्याला सुवर्ण मंदिर असेही म्हणतात. यावर, महाराजा रणजीत सिंह यांनी त्यांच्या कारकिर्दीत सोन्याचा लेप बनवला होता. मंदिराच्या आत गुळगुळीत काळ्या दगडाने बनवलेले शिवलिंग आहे.

nita ambani visit kashi vishwanath temple history
Konkan Tourism : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत पर्यटकांची संख्या रोडावली; काय आहे कारण?

काशी हे एकमेव स्थान आहे जिथे गंगा ही उत्तर वाहिनी आहे. इथे गंगेचे अनेक घाट आहेत. काशीमधील माता गंगा आणि पवित्र घाटाची आरती जगभरात प्रसिद्ध आहे. या आरतीसाठी लोकं दररोज मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

काशी विश्वनाथ मंदिराचा आकार

काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य शिवलिंग 60 सेमी उंच आणि 90 सेमी परिघाचे आहे. मुख्य मंदिराच्या आजूबाजूला काल-भैरव, कार्तिकेय, विष्णू, गणेश, पार्वती आणि शनी यांची छोटी मंदिरे आहेत.

मंदिरात 3 सोन्याचे घुमट आहेत, जे 1839 मध्ये पंजाबचे महाराजा रणजीत सिंह यांनी स्थापित केले होते. मंदिर आणि मशीद यांच्या मध्ये एक विहीर आहे, तिला ज्ञानवापी विहीर म्हणतात. स्कंदपुराणातही ज्ञानवापी विहिरीचा उल्लेख आढळतो. मुघलांच्या आक्रमणावेळी हे शिवलिंग ज्ञानवापी विहिरीत दडले होते असे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.