Best Places : ऑक्टोबर बनवा खास, जोडीदारासोबत एक्सप्लोअर करा हे प्लेसेस

तुमच्या जोडीदाराचा वाढदिवस ऑक्टोबरमध्ये असेल, किंवा तुमच्या लग्नाचा वाढदिवस या महिन्यात असेल तर तुम्ही नक्की या स्पेशल ठिकाणांचा भेट देण्याचा विचार करू शकता.
Best Places : ऑक्टोबर बनवा खास, जोडीदारासोबत एक्सप्लोअर करा हे प्लेसेस
esakal
Updated on

October Tourism :  

सध्या लोक सोशल मिडिया आणि काम यांना वेळ देण्याचा प्रयत्न करतात. कामासाठी अन् प्रवासात सोशल मिडियाला वेळ दिला जातो. पण, कुटुंबाला वेळ देणं शक्य होत नाही.  पण, कुटुंब अन् नाती मजबूत ठेवायची असतील तर त्यांना वेळ देणं महत्त्वाचं आहे.

केवळ कुटुंबच नाही तर एकमेकांना वेळ देणं हे पती-पत्नीच्या नात्यात गरजेचं आहे. वय निघून गेल्यानंतर पती-पत्नीने एकमेकांना वेळ देऊन काहीही फायदा नसतो. जर तुमच्या लग्नाला काही महिने किंवा वर्षे झाली असतील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत घालवण्यासाठी जास्त वेळ मिळत असेल, तर तुम्ही ऑक्टोबर महिन्यात त्यांच्यासोबत प्रवास करण्याचा विचार करू शकता.

Best Places : ऑक्टोबर बनवा खास, जोडीदारासोबत एक्सप्लोअर करा हे प्लेसेस
मनसोक्त करा पर्यटन सफर

ऑक्टोबर सुरू होतो आणि उष्णतेला पुन्हा सुरूवात होते. पावसाची सर कमी आलेली असते, त्यामुळे फिरण्यासाठी ही  योग्य वेळ आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अशा ठिकाणी जावे जिथे तुम्हाला त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल.

तुमच्या जोडीदाराचा वाढदिवस ऑक्टोबरमध्ये असेल, किंवा तुमच्या लग्नाचा वाढदिवस या महिन्यात असेल तर तुम्ही नक्की या स्पेशल ठिकाणांचा भेट देण्याचा विचार करू शकता.

जयपूर, राजस्थान

जयपूर हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रिलॅक्स होण्यासाठी देखील येथे जाऊ शकता. तुम्ही दिल्लीभोवती फिरण्यासाठी एखादे ठिकाण शोधत असाल तर तुम्ही तुमच्या बजेटमध्ये सहलीची योजना करू शकता. येथे भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.

जयपूरमध्ये हवा महाल, सिटी पॅलेस, नाहरगड किल्ला, जयगड किल्ला, जलमहाल, गलताजी, चोखी धानी, सांभार तलाव, जवाहर सर्कल, भूतेश्वर नाथ महादेव, हातनी कुंड, अशी अनेक ठिकाणे राजस्थानमध्ये पाहण्यासारखी आहेत. तुमचा रामबाग नेहरू बाजार, बापू बाजार आणि पिंक सिटी बझार येथून खरेदी करू शकता.

Best Places : ऑक्टोबर बनवा खास, जोडीदारासोबत एक्सप्लोअर करा हे प्लेसेस
Ziro Valley Tourism : भारतातल्या या ठिकाणाचं नावं आहे झिरो, जाणून घ्या का खास आहे हे शहर
राजस्थानमधील ऐतिहासिक वारसास्थळे तुम्हाला सुखद अनुभूती देतील
राजस्थानमधील ऐतिहासिक वारसास्थळे तुम्हाला सुखद अनुभूती देतीलesakal

शिलाँग, मेघालय

मेघालयची राजधानी असलेले शिलाँग हे शहरही पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. हे देखील पार्टनसह भेट देण्यासाठी योग्य आणि सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. शिलाँग हे मेघालयातील अतिशय सुंदर आणि मनमोहक ठिकाण आहे. शिलाँगमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता.

शिलाँगच्या आजूबाजूला अनेक सुंदर ठिकाणे आहेत. शिलाँग पीक, एलिफंट फॉल्स, लॅटलाम व्हॅली, वॉर्ड्स लेक, डॉन बॉस्को म्युझियम, लेडी हैदरी पार्क, मावफ्लांग व्हिलेज आणि राइनो हेरिटेज म्युझियम यासारख्या ठिकाणांना भेट देता येईल तुमच्या जोडीदारासोबत प्रवास करण्यासाठी येतो.

Best Places : ऑक्टोबर बनवा खास, जोडीदारासोबत एक्सप्लोअर करा हे प्लेसेस
Mahabaleshwar Tourism : महाबळेश्वर-पाचगणीतील 'ही' सुंदर हिल स्टेशन पाहिलीयेत?
शिलाँगच्या आजूबाजूला अनेक सुंदर ठिकाणे आहेत
शिलाँगच्या आजूबाजूला अनेक सुंदर ठिकाणे आहेतesakal

गोवा

पावसाळ्यात गोव्यातील किनाऱ्यांवर जाता येत नाही. तिथले पर्यटन ठप्प असते. पण, तुम्ही गोव्याला जाण्याची योजना देखील करू शकता. जो बीचसाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पालोलेम बीच, बागा बीच, दूधसागर वॉटरफॉल, बॉम जीसस बॅसिलिका, अगुआडा फोर्ट, सॅटर्डे नाईट मार्केट, नेव्हल एव्हिएशन म्युझियम, अंजुना बीच आणि चोराव बेट यासारख्या ठिकाणांना भेट देण्यासाठी जाऊ शकता.

गोव्यातील सुंदर बिच
गोव्यातील सुंदर बिच esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.