दक्षिणेतील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी अनेकजण या परिसरात ट्रिपचे नियोजन करतात. कन्याकुमारी, केरळ अशी प्रसिद्ध ठिकाणे फिरण्यासाठी डिसेंबर किंवा दिवाळीच्या सुट्टीत हे प्लॅन आखले जातात. अनेक नवी जोडपी हनिमून डेस्टिनेशम म्हणून केरळमधील अनेक फेमस ठिकाणांनाही भेट देतात.
दक्षिणेतील निळाशार समुद्र अनुभवण्यासाठी अनेकजण उत्साही असतात. तेथील निसर्गसौदर्य, ग्रामीण बाज, खाद्यसंस्कृती, सुंदर शांत समुद्रकिनारे अनुभवण्यासाठी पर्यटकांना या राज्यांना भेट द्यायची असते. यामध्ये सर्वाधिक पर्यटक हे केरळला भेट देतात. नैसर्गिकदृष्ट्या केरळ हे अतिशय सुंदर ठिकाण असल्याने आम्ही यंदा फिरण्यासाठी जाणार आहोत असे अनेकांकडून ऐकायला मिळते.
केरळशिवयाही अनेक शहरे अशी आहेत जी निसर्गाने समृद्ध आहेत. यातीलच एक म्हणदे पुदुच्चेरी होय. हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षण आहेत. देशातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक हाही प्रदेश आहे. जर तुम्हाला निळाशार पाण्याची आठवण येत असेल तर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.
पुदुच्चेरीतील प्रसिद्ध ठिकाणे
पुदुच्चेरीमधील प्रोमोनेड बीच शहरातील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. सूर्योदय पाहण्यासाठी पर्यटक या बीचवर गर्दी करत असतात. पर्यटकांना मोहून टाकणार एक महत्वाचा प्रदेश म्हणून या प्रदेशाला ओळखले जाते.
फ्रेंच वॉर मेमोरियल पुदुच्चेरीच्या गोबर्ड अवेन्युवरील आकर्षक स्मारक आहे. पहिल्या महायुद्धामध्ये ज्या फ्रेंच सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.
येथील पोमेनेड बीचजवळ जुने लाईटहाउस पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. १८३६ साली तयार करण्यात आलेल्या जुन्या लाईटहाउसची क्षमता २६ नॉटीकल माईल इतकी आहे.
बोटॅनिकल गार्डनमध्ये असंख्य प्रकारच्या वनस्पतींचा संग्रह पाहायला मिळतो. तसेच या गार्डनमध्ये ट्रेन, मत्स्यालय तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी आहेत.
या शहराच्या दक्षिणेश ७ किमी अंतरावर हा बीच असून चुन्नाम्बर नदीतून बोटीने या बीचवर जावे लागेत. तिथे गेल्यानंतर तुम्ही निळाशार, शांत आणि सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या बीचचा आनंद घेऊ शकता.
शांत नितळ पाणी व सोनेरी वाळू हे या बीचचे आकर्षण आहे. इथून दिसणारे सूर्योदयाचे दृश्य अद्भभूत असते. सकाळी किंवा सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी सेरेनीटी बीच उत्तम आहे.
पुदुच्चेरी शहर जलक्रिडेसाठी ओळखले जाते. इथल्या शांत नितळ निळ्या पाण्यात पेरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग, स्नोर्कलिंग, बोटिंग, सर्फिंग असे केले जाते.
तुम्ही जर येथे पर्यटनाला जाणार असाल तर इथे मिळणारे खाद्यपदार्थ जरुर खा. येथील रेस्टोरंटमध्ये फ्रेंच पदार्थ अधिक मिळतात. ते नक्की खा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.