Pre-Wedding Photoshoot :  प्री-वेडींगसाठी वेळ नाही, बाहेर कशाला जाताय मुंबईतील या सुंदर ठिकाणी करा फोटोशूट

प्री-वेडींग करायचं ठरलं की त्यासाठी योग्य लोकेशन शोधलं जातं. कारण, कपल्ससाठी बेस्ट ठरेल अन् त्यांना नेहमी लक्षात राहील अशा ठिकाणी करायचं असतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मुंबईत तुम्ही कुठे प्री-वेडींग करू शकता हे सांगणार आहोत.
Pre-Wedding Photoshoot
Pre-Wedding Photoshoot esakal
Updated on

Pre-Wedding Photoshoot :

दिवाळीनंतर तुलसीविवाहाची वाट काही विवाहास इच्छुक मंडळी पाहत असतात. कारण, तुलसीचा विवाह पार पडला की लग्नकार्यास मुहूर्त मिळतो. चातुर्मासाच्या काळात विवाह करणे योग्य नसते. त्यामुळेच, लग्नासारख्या पवित्र कार्यासाठी योग्य मुहूर्त शोधला जातो.

तुलसीविवाह लवकरच होणार आहे. त्यामुळे ज्या मंडळींना लग्न ठरवली आहेत, अशांसाठी हा काळ एन्जॉय करण्याचा आहे. अशातच प्री-वेडींग शूट करण्याचे फॅड आहे. लग्नापूर्वी वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणी फोटो, व्हिडिओ काढून ते सोशल मिडिया अन् चक्क लग्नाच्या मंडपात दाखवले जातात.

Pre-Wedding Photoshoot
दिवाळीसाठी आई कुठे काय करते फेम मधुराणीचा सुंदर अंदाज

प्री-वेडींग करायचं ठरलं की त्यासाठी योग्य लोकेशन शोधलं जातं. कारण, कपल्ससाठी बेस्ट ठरेल अन् त्यांना प्री-वेडींग नेहमी लक्षात राहील अशा ठिकाणी करायचं असतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मुंबईत तुम्ही कुठे प्रीवेडींग करू शकता हे सांगणार आहोत.

मुंबईत राहणारे, काम करणारे तरूण-तरूणी प्रीवेडींगसाठी वेगळा वेळ काढू शकत नाहीत. तसेच, मुंबई बाहेर शूट करण्यासाठी ऑफिसमधून सुट्टी काढावी लागेल. पुढे लग्नासाठीही काही दिवस सुट्ट्या घ्याव्या लागणार असतात. त्यामुळे तुम्ही मुंबईतच कुठे प्रीवेडींग करू शकता याचे काही बेस्ट ऑप्शन्स आपण पाहणार आहोत.

Pre-Wedding Photoshoot
Underwater Photoshoot Viral : या अभिनेत्रीच अंडरवॉटर फोटोशूट व्हायरल ; पाहा व्हिडीओ

गेटवे ऑफ इंडिया

जगभरात कितीही फिरलं तरी मुंबईत येऊन गेटवे ऑफ इंडियासमोर फोटो नाही काढला तर काय उपयोग. तुम्ही मुंबईत असाल तर हा बेस्ट ऑप्शन आहे.  मुंबईची ओळख असलेल्या गेट-वे ऑफ इंडियासमोर तुम्ही प्री-वेडिंग फोटोशूट करू शकता. ताजमहाल हॉटेल देखील समुद्राच्या समोर आहे प्री-वेडिंग फोटोशूटसाठी मुंबई हे उत्तम ठिकाण आहे.

Pre-Wedding Photoshoot
Viral Photoshoot :  ‘कुणी येणार गं’ लेक, आई, सासू आणि आजी एकाचवेळी प्रेग्नंट !

 

मरीन ड्राइव्ह

मुंबईत येणारा प्रत्येक माणूस हा मरीन ड्राइव्हला क्वीनचा नेकलेस म्हणूनही ओळखला जातो. मरीन ड्राइव्ह वर काही लोकांच्या प्रेमकथा या इथूनच सुरू झालेल्या असतात. तर काहींनी इथे एकत्र भेटून स्वप्न रंगवलेली असतात. एका बाजूला समुद्र आणि दुसरीकडे रस्ता प्रेमाच्या आठवणी जागवणाऱ्या या ठिकाणी फोटो काढले तर ते नेहमी लक्षात राहणारे ठरतील.

Pre-Wedding Photoshoot
Divorced Photoshoot : नवऱ्याने दिला घटस्फोट; बायकोने फोटोशूट करत साजरा केला आनंद

बँडस्टँड

जर तुम्ही समुद्र किनाऱ्यावर फोटोशूट करण्यासाठी जागा शोधत असाल. तर बांद्रा बँडस्टँड तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो, रोमँटिक फोटोशूटसाठी बँडस्टँडमध्ये एक किल्ला आहे, एक छोटासा बागिचा आहे, अथांग समुद्र आणि बिच आहे. इथल्या किनाऱ्यावर शूट केले तर तुम्हाला कोकणात गेल्याचा फिल येईल.  

Pre-Wedding Photoshoot
Diwali Photoshoot Poses : दिवाळीत फोटोशूट करताय का? मग हे पोझेस ट्राय करा...

 जुहू बीच

मुंबईचा लोकप्रिय बीच जुहू बीच आहे. इथे तुम्हाला रोमँन्टीक वातावरणात फोटो काढता येतील. प्री-वेडिंग शूटसाठी योग्य ठिकाणांपैकी एक आहे. त्यामुळे, तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही प्री-वेडिंग फोटोशूट देखील करू शकता.

जुहू बीच
जुहू बीच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.