Safety Tips For Adventure Trip : न्यू इयरसाठी अ‍ॅडव्हेंचर ट्रिपवर निघालात? फॉलो करा या टिप्स

कोणतीही अ‍ॅडव्हेंचर ट्रिप ही थरारक असते
Safety Tips For Adventure Trip
Safety Tips For Adventure Trip esakal
Updated on

Safety Tips For Adventure Trip : बऱ्याचदा भारतात एखादी ट्रिप प्लॅन करताना आपल्याला सुंदर पण अ‍ॅडव्हेंचर्स ठिकाणी जाण्याची इच्छा असते. कोणतीही अॅडव्हेंचर ट्रिप ही थरारक असते. अॅडव्हेंचर ट्रिपचा अनुभव सामान्य सहलीपेक्षा नेहमीच वेगळा असतो.या ट्रिपमधून आपल्याला नवनवे अनुभव येतात. यात जोखीमसुद्धा मोठ्या प्रमाणात असते.अशावेळी काही गोष्टी लक्षात ठेवून धैर्य राखणे आवश्यक असते.

Safety Tips For Adventure Trip
Metkut Recipe : बारा महीने ज्याच्यासोबत मेतकूट जमतं अशा मेतकूट भाताची रेसिपी

त्यामुळे अ‍ॅडव्हेंचर ट्रिपचा आनंद घ्यायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. जर तुम्ही या नवीन वर्षात अ‍ॅडव्हेंचर ट्रिपच्या योजना आखत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमचा प्रवास सुरक्षित आणि अद्भुत बनवू शकता. अ‍ॅडव्हेंचर ट्रिप्स जशा रोमांचक असतात अगदी तशाच मजेदार आणि धोकादायकही असतात. अशा परिस्थितीत ट्रिप्सचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी स्वतःच्या सुरक्षिततेचा विमा घेणं आवश्यक आहे.

Safety Tips For Adventure Trip
Health Tips: पायाला सतत मुंग्या का येतात? तुम्ही या आजाराला निमंत्रण तर देत नाहीये; वाचा सविस्तर

बंजी जंपिंगसाठी टिप्स

पायाला दोरी बांधून डोंगरावरून किंवा पर्वतावरून उडी मारणे याला बंजी जंपिंग म्हणतात. अशा उंच ठिकाणाहून उडी मारायची असेल तर धाडस आवश्यक असतं. यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शकाच्या निगराणीखाली सराव करावा लागतो. पुरेसा सराव झाल्यानंतर उंच ठिकाणावरून उडी मारण्याचा प्रयत्न करा.

Safety Tips For Adventure Trip
Kashid Beach : एका रोमांचक अशा शांत ठिकाणी फिरायला जायची इच्छा आहे? या ठिकाणी प्लॅन करू शकता

स्कूबा डायव्हिंग करणार असाल तर खालील गोष्टींची काळजी घ्या

स्कूबा डायव्हिंग या प्रकारात समुद्राच्या आतील जीवसुष्टी अगदी जवळून पाहण्याची संधी आपल्याला मिळते. जितकं खोल जाल तितकी ऑक्सिजनची कमतरता भासते. त्यामुळे ऑक्सिजन मास्क लावूनच पाण्यात उतरावं. समुद्रातील मासोळ्या आणि इतर जीव आपल्या जवळ आले तरी घाबरून जाऊ नये. पाण्यात जाण्यापूर्वी स्कूबा प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावं.

Safety Tips For Adventure Trip
Tourism : शालेय सहलीमुळे होणार कोट्यवधीची उलाढाल

रिव्हर राफ्टिंग टिप्स

होडीत बसून खळखळणाऱ्या नद्यांच्या लाटांवर उसळी मारणं अजिबात सोपं नाही. नदीतील लाटांमध्ये राफ्टिंग करण्याची मजा काही औरच असते. राफ्टींगसाठी डोंगराळ भागातील नदीची निवड केली जाते. पण रिव्हर राफ्टिंग करताना अनेकवेळा बोट उलटण्याचा धोका असतो. राफ्टींग करताना बोटमधून आपण खाली पडणार नाही याची काळजी घेतली जावी त्यासाठी जीवनरक्षक जॅकेट घालावे लागते. काही सेकंदांसाठी का होईना बोटीतून खाली पडण्याचा थरार अनुभवण्यासारखा असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.