Parli Valley : सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा अन् घाट.. सज्जनगड, ठोसेघर, केळवली धबधब्यांवर पर्यटकांचा बहर

किल्ले सज्जनगडावर शेकडो पर्यटकांनी लावली हजेरी
Thoseghar Kelvali waterfall
Thoseghar Kelvali waterfallesakal
Updated on
Summary

ठोसेघर धबधबा परिसर तर पर्यटकांनी ओसंडून गेला होता. मालदेव येथील धरण परिसरातही पर्यटकांची गर्दी दिसून येत होती.

परळी : परळी खोऱ्यात ठोसेघर धबधबा (Thoseghar Waterfall), सज्जनगड, चाळकेवाडीचे पवनचक्की पठार, केळवली धबधबा ही ठिकाणे पर्यटकांनी गजबजलेले आहेत. सलग तीन-चार दिवसांची शासकीय सुटी आल्याने सज्जनगड, ठोसेघर, केळवलीला पर्यटकांचा बहर आल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे.

सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, घाट रस्त्यातील नागमोडी रस्ते, ऊन-पावसाचा लपंडाव हे अन् पंचक्रोशीत असलेली पर्यटनस्थळे ही वर्षा ऋतू सुरू होताच पर्यटकांना खुणावत असतात. त्यातच जोडून सुट्या आल्याने या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. किल्ले सज्जनगडावर शेकडो पर्यटकांनी हजेरी लावली. यामुळे वाहनतळ परिसरात पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता.

Thoseghar Kelvali waterfall
NCP Crisis : राजकीय घडामोडी सुरु असताना अजितदादा शरद पवारांना का भेटले? अखेर कारण आलं समोर; खुद्द दादानीच केला खुलासा

वाहनतळापासून ते अगदी सज्जनगड फाट्यापर्यंत वाहनांचे पार्किंग हे रस्त्यालगत केल्यामुळे अनेकांना त्रास निर्माण होत होता. सज्जनगड फाट्यापासून पर्यटकांना गडापर्यंत पायपीट करावी लागली. ठोसेघर धबधबा परिसर तर पर्यटकांनी ओसंडून गेला होता. मालदेव येथील धरण परिसरातही पर्यटकांची गर्दी दिसून येत होती.

Thoseghar Kelvali waterfall
Kolhapur Ganeshotsav : एक दिवस तुमचा, पुढील 364 दिवस आमचे असतील; साऊंड सिस्टीमबाबत पोलिस अधीक्षकांचा थेट इशारा

केळवलीत एसटी फेरी बंद

केळवली येथे पर्यटक धबधबा पाहण्यासाठी येत असतात. सुट्यांमुळे वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे गावात एसटी फिरवायला जागा नसल्याने ऐन पावसाळ्यात येथील एसटीच्या काही फेऱ्या कातवडी येथूनच साताऱ्याकडे जात आहेत.

Thoseghar Kelvali waterfall
Amboli Forest : आता आंबोली जंगल सफरीसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये; वन विभागानं घेतला महत्वाचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.