Satara Picnic Spot : सातारा जिल्हा हा निसर्गरम्य म्हणून ओळखला जातो. दुष्काळी माणखटाव तालुक्यापासून ते महाप्रचंड पावसाच्या जावळी खोऱ्यापर्यंत विविधता याच जिल्ह्यात पहावयास मिळते. साताऱ्यातील सर्वात फेमस पर्यटन ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. मात्र महाबळेश्वर सोडून देखील साताऱ्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत ज्यांना आपण भेट देऊ शकतो.
भांबवली वझराई धबधबा
भांबवली वझराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याची उंची 1840 फूट (560 मीटर) आहे आणि तो सरळ उभ्या दगडावरून वाहतो आणि याला तीन पायऱ्या आहेत. उरमोडी नदी ही या धबधब्याचा उगम स्थान आहे. हा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेला आहे. प्रसिद्ध कास पुष्प पठारापासून 5 किमी दूर आणि पुष्प पठारापासून 2 किमी दूर आहे.
जवळच्या पुष्प पठारामध्ये हिरवेगार डोंगर आणि फुलं आपल्या संवेदना जागृत करतील. आनंददायी हवामान खरोखरच आपल्याला प्रेमात पाडेल. पण या ठिकाणाचे खरे आकर्षण निर्मनुष्य शांतता आहे आणि आपल्याला अडथळा आणण्यासाठी कोणतेही फेरीवाले, गाईड आणि कॅमेरामॅन येत नाहीत. धबधबा हा बारमाही स्वरुपाचा आहे आणि वर्षातील 12 महिने वाहतो.
तापोळा
तापोळा (बोट क्लब) महाबळेश्वर पासून ३० कि.मी.अंतरावर सहलीसाठी आणि बोटिंग करण्यासाठी सुंदर तापोळा तलाव आहे. हा तलाव कोयना धरणातील शिवसागर या विशाल जलाशयाचाच शेवटचा भाग आहे.
भांबवली पुष्प पठार
भांबवली पुष्प पठार हे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. हे सातारा शहरापासून अंदाजे 30 किमी दूर स्थित आहे. हे पठार उंच डोंगराळ आणि गवताळ प्रदेशात वसलेले आहे. पाऊस, विशेषकरून ऑगस्ट ते ऑक्टोबर पर्यंत याला एक पुष्प पठार बनवतो. भांबवली पठारवर 150 पेक्षा अधिक प्रकारचे फुले, झुडुपे आणि गवत आहेत. पठार मोठ्या प्रमाणावर बेसाल्ट दगडाच बनलेली आहे. बेस्टॉल्ट खडक हा जमिनीच्या पृष्ठभागाच्या वर एक इंच पेक्षा जास्त असतो.
भांबवली पठारवर उगवलेले झाडे सामान्यत: झुडुपे या प्रकारचे आहेत. भांबवली पुष्प पठार हे देखील त्याच्या दुर्मिळ वनस्पती आणि विशिष्ट प्रदेशातील किंवा इथं आढळून येणाऱ्या प्राण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. वेगवेगळ्या आणि दुर्मिळ फुलांनी हे ठिकाण भरलेल आहे. करवी, सोनकी, स्मितिया, बाल्म, ऑर्किड अशा काही पुष्प जाती आहेत ज्या या पठारावर उमलतात.
याठिकाणी भेट देण्यासाठी ऑगस्ट आणि ऑक्टोबर बेस्ट आहे. भांबवली पठार त्याच्या जैव-विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. सोबतच बोटॅनिकल सायन्ससाठी नवीन असलेल्या पठारवर बऱ्याच प्रजाती आढळतात. पठारवर अनेक स्थानिक, जंगली वनस्पती आढळतात. या ठिकाणी पक्षी देखील भरपूर प्रमाणात आढळतात.
पाचगणी
पाचगणी हे महाबळेश्वर पासून जवळ (१८ कि.मी.) अंतरावर असलेले आणखी एक थंड हवेचं ठिकाण आहे. या ठिकाणी सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण असलेल्या निवासी शाळांमुळे हे ठिकाण प्रसिद्धीस आले. पाचगणीला भेट म्हणजे एक सुखद अनुभवच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.