गेल्या सात, आठ दिवसांपासून पावसाने उसंत घेऊन ऊन- पावसाचा खेळ सुरू केल्याने फुलांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
कास : नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या कास पुष्प पठारावरील (Kaas Plateau) फुलांचा रंगसोहळा ऐन बहरात आला आहे. सर्वत्र विविधरंगी फुलांचे गालिचे दिसत असून, ते लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान, सलग चार दिवस सुट्या आल्याने पर्यटकांची पठारावर गर्दी होऊ लागली आहे.