सध्या पठारावर काही ठिकाणी निळी टोपली कारवी, लाल तेरडा, पांढरे गेंद आणि कीटकभक्षी निळी सीतेची आसवे या फुलांची संमिश्र छटा पाहायला मिळत आहेत.
कास : पुष्प पठार कासवर (Kaas Plateau) फुलांचे सडे बहरण्यास सुरुवात झाली आहे. लाल, पांढरी, निळी रंगछटा ठिकठिकाणी दिसू लागल्याने फुलांचा साज लेवून कास पर्यटकांच्या (Tourists) स्वागताला सज्ज झाले आहे. जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराच्या हंगामाचा प्रारंभ पाच सप्टेंबरपासून करण्यात आला. आतापर्यंत हजारो पर्यटकांनी कासला भेट देऊन फुलांच्या दुनियेचा आनंद घेतला आहे.