एका पर्यटकासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क असेल. बारा वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश राहील. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ४० रुपये शुल्क असणार आहे.
कास : जागतिक वारसास्थळ व फुलांच्या विविधरंगी दुनियेसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावरील फुलांच्या हंगामाची प्रतीक्षा आता संपुष्टात आली. गुरुवारी (ता. पाच) कास कार्यकारी समितीच्या वतीने हंगामाचा अधिकृत नारळ फोडण्यात येणार आहे. या उद्घाटनासाठी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज आदींसह मान्यवर उपस्थित राहतील.