पावसाळा सुरू झाला, की कास परिसरातील पर्यटन बहरते. जून महिन्यापासूनच पर्यटकांची पावले कासकडे वळतात.
कास : श्रावणाच्या आगमनानंतर काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने नंतर मात्र तुफान बॅटिंग चालू केली आहे. त्यामुळे फुलांसाठी पोषक झालेले वातावरण पुन्हा बदलले आणि सर्वांच्या प्रतीक्षेत असलेला कासचा फुलोत्सव (Kaas Pathar) काही दिवसांसाठी पुन्हा लांबवावा लागला असून, पाऊस कधी विश्रांती घेईल आणि त्यानंतर फुलांचे प्रमाण पाहून हंगाम सुरू करण्याचा निर्णय पठाराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कास कार्यकारी समितीमार्फत घेतला जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना फुलांचा आनंद घेण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.